Latest Maharashtra News Updates: प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक - महाजन
esakal July 27, 2025 07:45 PM
Pune LiveUpdate: प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक - महाजन

प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक असे महाजन म्हणाले आहे.

Pune LiveUpdate: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणे खडसेंच्या पतीला अटक

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणे खडसेंच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

Live Update: हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू

हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात प्रचंड गर्दी जमल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू. मी घटनास्थळी जात आहे. घटनेचा सविस्तर अहवाल येण्याची वाट पाहत आहे: गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे एएनआयला

Solapur Live : उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सकाळी 7 वाजल्यापासून 35000 विसर्ग

उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात आज सकाळी 7 वाजल्यापासून 35000 एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे, नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Pune Live : अमृतसरमध्ये पाकिस्तानशी संबंधित ५ प्रमुख तस्करांना अटक

अमृतसर ग्रामीण पोलिसांनी पाकिस्तान आयएसआय समर्थित सीमापार अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि ड्रग्ज पैशांच्या तस्करी नेटवर्कमधील ५ प्रमुख आरोपींना अटक केली. केंद्रीय एजन्सींशी जवळून समन्वय साधून, पोलिसांनी २ मॅगझिनसह एके सायगा ३०८ असॉल्ट रायफल, ४ मॅगझिनसह दोन पिस्तूल ९ एमएम, एके रायफलचे ९० जिवंत काडतुसे, १० जिवंत काडतुसे (९ एमएम), ७.५ लाख रुपये रोख, एक कार आणि ३ मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मालाची डिलिव्हरी गँगस्टर जग्गु भगवानपुरियाचा ओळखीचा सहकारी नव पंडोरीला केली जाणार होती: डीजीपी पंजाब पोलिस

Washim : चार पदरी रस्त्याचं काम ५ महिन्यांपासून ठप्प, खोदलेला रस्ता अन् खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

वाशिम जिल्ह्यातून अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी सुरू असलेल्या चार पदरी रस्त्याचं काम गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प आहे. या महामार्गावर एका बाजूला ठेकेदाराने खोदलेला रस्ता, तर दुसऱ्या बाजूला मोठमोठे खड्डे अशा गंभीर परिस्थितीत वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Raigad : इंदापूर तळा मार्गावर बर्निंग कारचा थरार

रायगडच्या इंदापूर तळा मार्गावर रात्री बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. मुठवली गावाजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतला. यात कार जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. कारचालकाच्या लक्षात येताच तो बाहेर पडला.

Ratnagiri news : रत्नागिरीत उपमुख्यमंत्री शिंदे अन् गृहाराज्यमंत्री योगेश कदम यांचा दौरा

रत्नागिरीत आज मंत्र्यांचे दौरे असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये असणार आहेत. खेडमधील स्व.मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या सोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील असणार आहेत. तर रत्नागिरीतील मिरकडवाडा बंदराच्या कामाचं भूमीपूजन बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित असणार आहेत.

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर वाढला, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार

राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालीय. मराठवाड्यालाही पावसानं झोडपलंय. तर कोल्हापूर सांगलीत पावसाची संततधार सुरू असून धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही धरणांमधून विसर्ग सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.