माझ्यासमोर बसलेल्या व्यक्तिला वाल्मिक कराडचा तुरुंगातून फोन… अंबादास दानवेंनी टाकला बॉम्ब; राजकीय वर्तुळ हादरलं
Tv9 Marathi July 27, 2025 07:45 PM

छत्रपती संभाजीनगर : नुकताच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केलीये. वाल्मिक कराडबद्दल त्यांनी अत्यंत मोठा दावा केलाय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप असून तो सध्या कोठडीत आहे. अंबादास दानवे म्हणाले की, आताही वाल्मिक कराड जेलमधून सर्व काही करीत आहे. माझ्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीला जेलमधून वाल्मिक कराडचा फोन आला होता. मी हे तीन महिन्यापूर्वी सांगितले होते, चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. थेट त्यांनी मोठा आरोप केलाय.

संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यातील वादाबद्दल बोलताना अंबादास दानवे म्हणाले, त्या खात्याचे मंत्री बैठक घेऊ शकतात. एवढेच नाही तर काम असेल तर दुसऱ्या खात्याचे मंत्री देखील बैठक घेऊ शकतात. जनतेच्या कामासाठी राज्यमंत्री असे बैठक घेऊ शकतात. मात्र, धोरण काय ते माहिती नाही. ही लोकशाहीमधील यंत्रणा आहे. याला स्वीकारली पाहिजे. सिस्टीम आहे याला स्वीकारले पाहिजे, दोघांनी पत्र लिहिणे ही चूक आहे. फोन करून किंवा भेटून बोलले पाहिजे होते. रेकॉर्डवर पत्र लिहिणे हे योग्य नाही.

कॅबिनेट मंत्र्यांना आपले अधिकार राज्यमंत्र्यांकडे असावे असे वाटत नाही. संजय शिरसाठ यांनी आपल्या विभागाच्या सचिवाला सांगायला पाहिजे होते. धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना अंबादास दानवे म्हणाले, कृषी विभागात नैतिकदृष्य घोटाळा झालेला आहे. मी रोहित पवारांना सल्ला देईल, फोन टॅप केला तर होऊ द्या, आपण काही करीतच नाहीत. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात निवडणुकीसाठी ही योजना करण्यात आली आहे. आता समोर येत आहे पुरुषांनी लाभ घेतला. हा सर्व प्रकार गंभीर आहे, याची चौकशी झालीच पाहिजे.

संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबद्दल बोलताना अंबादास दानवे म्हणाले, राज्यातील मंत्र्यांना काही महत्व नाही सर्व कारभार मुख्यमंत्री घेत आहेत. आताचे सर्व मंत्री पुतळ्यासारखे फक्त मुखावटे आहेत. या सरकारने परमवीर सिंह यांना पुरावा नसताना कारवाई केली. सरकारला एवढी साथ दिली. आता त्यांना क्लिनचिट मिळणे ही काही बातमी होऊ शकत नाही. महिला मारहाण प्रकरणाबद्दल बोलताना म्हणाले, महिलेचे फोटो पाहिले अतिशय वेदनादायक आहे. एखाद्या महिलेला ह्या पद्धतीने मारहाण करणे गंभीर आहे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर पोलिसांविरोधात आम्ही तक्रार देऊ.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.