पालिकेचा अनधिकृत बांधकामांवर बडगा
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) ः कल्याण डोंबिवली पालिकेने बल्याणी परिसरात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामावर बडगा उगारला असून, शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशीही पालिकेने कारवाई सुरूच ठेवली आहे.
अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने बल्याणी येथील डोंगरवाली परिसरातील २५ जोते तसेच उर्णी परिसरातील दोन रूमच्या बांधकामांवर कारवाई करीत पाडकाम केले. या कारवाईप्रसंगी ठेकेदारांचे १० कामगार, एक जेसीबी, पोलिस कर्मचारी असा फौजफाटा होता. यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.