ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताच्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूज मिसाइलने पाकिस्तानवर मात केली. पाकिस्तानकडे भारताच्या या मिसाइलच काहीच उत्तर नव्हतं. पाकिस्तानला आतापर्यंत चिनी शस्त्रास्त्रांवर अवलंबून आहे. पण त्यांचा आता MADE IN CHINA शस्त्रांवर विश्वास उरलेला नाही. आता पाकिस्तानी मिसाइल वैज्ञानिक भारतीय क्षेपणास्त्रांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताकडे असलेल्या अग्नि-5 सारखी मिसाइल बनवल्याचा मुनीर सेनेने दावा केला आहे. पण या मिसाइलच परीक्षण होताच, मिसाइल हवेत उडण्याऐवजी जमिनीवर कोसळलं.
असं पहिल्यांदा झालेलं नाही. पाकिस्तानी मिसाइल वारंवार धडाम होत आहेत. जुलै महिन्यात पाकिस्तान दोन मिसाइल दुर्घटना झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची शाहीन-3 मिसाइल, चाचणी दरम्यान बलूचिस्तानमधील अणवस्त्र तळाच्या जवळ कोसळलं. आता पाकिस्तानच्या अबाबील मिसाइलची चाचणी फेल गेली.
भारताच्या कुठल्या मिसाइलच कॉपी पेस्ट वर्जन
पाकिस्तानी मिसाइलमध्ये किती ताकद आहे आणि काय होऊ शकतं. याचं उत्तर पाकिस्तानच्या अबाबील मिसाइलच्या चाचणी दरम्यान मिळालं. त्याचा व्हिडिओ समोर आलाय. यात मिसाइल फेल होताना दिसतय. शहबाजचे पाकिस्तानी वैज्ञानिक काही करु शकले नाहीत. ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी सैन्याच्या तयारीची पोल-खोल झाली तसच आता पाकिस्तानची मिसाइल ताकद किती दुबळी आहे ते समोर येतय. अणवस्त्र वाहून नेणारं प्रत्येक पाकिस्तानी क्षेपणास्त्र त्यांच्यासाठीच धोका बनत आहे. कारण ही मिसाइल्स चाचणी मध्येच फेल होत आहेत. पाकिस्तानाच अबाबील मिसाइल अग्नि-5 क्षेपणास्त्राच कॉपी पेस्ट वर्जन होतं.
अबाबील मिसाइल त्याच दिशेने एक पाऊल
पाकिस्तानने चीनकडून विकत घेतलेली PL-15 मिसाइल्स भारतावर डागली. फतह आणि बाबर सारख्या मिसाइल्सचा सुद्धा वापर झाला. पाकिस्तानी सैन्याने आपली संपूर्ण मिसाइल ताकद वापरली. मुनीर सेनेच्या शस्त्रास्त्र डेपोमधील पाकिस्तानी आणि चिनी मिसाइल्सचा स्ट्राइक रेट शुन्य ठरला. पाकिस्तानी मिसाइल्स हवेतच नष्ट झाली. भारताच्या S-400, आकाश एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानी मिसाइल्सचा ढिगारा बनवून टाकला. आता पाकिस्तान भारतीय मिसाइल्सची कॉपी करत आहे. अबाबील मिसाइल त्याच दिशेने एक पाऊल आहे.