केडगाव, ता. २९ : वाखारी (ता.दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार केलेल्या चारही आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
न्यू अंबिका कला केंद्रात २१ जुलैला मध्यरात्री नृत्य चालू असताना आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ कैलास ऊर्फ बाळासाहेब मांडेकर यांनी गोळीबार केला होता. या संदर्भात गणपत जगताप, चंद्रकांत मारणे, रघुनाथ आव्हाड या चौघांवर गुन्हा दाखल झाला होता. या चौघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. तर चंद्रकांत मारणे याचा रक्तदाब वाढल्याने अटकेनंतर त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे करत आहे.