मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली. शिंदेंच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. शिंदे गटाच्या मंत्र्यांना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी माहिती देण्यात आली नव्हती.
मीडिया रिपोर्टनुसार, एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याविषयी माध्यमांना देखील कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना खासदारांशी संवाद साधून रणनीती ठरवणार असल्याचं बोललं जात आहे. पावसाळी अधिवेशनात सुरु असलेल्या घडामोडींवरही चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.
Shailesh Jejurikar : मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G ला 'भारतीय' नेतृत्व; मराठमोळे शैलेश जेजुरीकर कोण आहेत? VIDEO महायुतीच्या प्रतिमेला धक्का?सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गेल्या काही दिवसांत चर्चेत होते. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. गायकवाड यांच्या मारहाणीमुळे विरोधकांनी टीकास्त्र सोडलं होतं. तर मंत्री संजय शिरसाट यांचेही बेडरुममधील पैशांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे महायुती सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा होती.
Mahadev Jankar : भाजपसोबतची युती सर्वात मोठी चूक; महादेव जानकरांनी मनातलं सगळंच सांगितलंमहायुतीतही धुसफूस असल्याचीही जोरदार चर्चा आहे. काही भाजप आमदारांकडून शिंदे गटाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. तर नगरविकास विभागाकडून निधीवाटपासाठी शिंदे गटाच्या मतदारसंघाना प्राधान्य दिलं जात असल्याची ही तक्रार काही भाजप आमदारांनी केली आहे. या तक्रारीनंतर फडणवीसांनी सर्व प्रस्तावांना अंतिम मंजुरी ही त्यांच्या देखरेखीखाली करावी, असे निर्देश दिले.
Nashik News : ईडीचा माजी आयुक्ताला दणका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका कृत्याने संशय बळावलाएकनाथ शिंदे त्यांची प्रतिमा राखून आहेत. तसेच लोकांशी दांडगा जनसंपर्क राखून आहेत. दुसरीकडे त्यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या शासकीय निर्णयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळे पडद्यामागे अंतर्गत तपास सुरु असल्याचाही चर्चा रंगू लागल्या आहेत.