ENG vs IND : ही काय फालतुगिरी, अंपायर कुमार धर्मसेनाकडून भारतासोबत उघड उघड चिटिंग! पाहा व्हीडिओ
GH News July 31, 2025 11:13 PM

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेत आतापर्यंत अनेक वाद झाले आहेत. त्यानंतर आता पाचव्या कसोटीतील पहिल्याच दिवशी वाद पाहायला मिळाला. हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्यातील पहिल्या सत्रात अंपायर कुमार धर्मसेना यांच्या एका कृतीमुळे वादाला तोंड फुटलं आहे. अंपायर धर्मसेना यांनी या एका कृतीद्वारे इंग्लंडला एकाप्रकारे मदतच केली, असा आरोपही केला जात आहे. नक्की काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

पहिल्या सत्रात जोश टंग याने साई सुदर्शन विरुद्ध एलबीडब्ल्यूसाठी अपील केली. मात्र कुमार धर्मसेना यांनी या अपीलला कोणतीच दाद दिली नाही. मात्र त्यानंतर धर्मसेना यांनी एक कृती केली. त्यामुळे या वादाला तोंड फुटलं आहे. धर्मसेना यांनी या कृतीसह इंग्लंडला मदत केल्याचं म्हटलं जात आहे.

कुमार धर्मसेना यांनी काय केलं?

इंग्लंडकडून जॉश टंग याने भारताच्या डावातील 13 वी ओव्हर टाकली. टंगने या ओव्हरमध्ये 1 फुलटॉस बॉल टाकला. टंगने साईला टाकलेल्या फुलटॉस बॉलवर एलबीडब्ल्यूची अपील केली. साई हा बॉल खेळताना पडला. त्यानंतर कुमार धर्मसेना यांनी इशारा केला. ज्यामुळे वादाला तोंड फुटलं. धर्मसेना यांनी साई नॉट आऊट असल्याचं सांगितलं. तसेच साईच्या पॅडला लागण्याआधी बॉल त्याच्या बॅटला लागलाय, असं धर्मसेना यांनी बोटांद्वारे इशारा करत सांगितलं. त्यामुळे इंग्लंडने रीव्हीव्यू घेतला नाही.

कुमार धर्मसेनाकडून इंग्लंडला मदत केल्याचा आरोप!

धर्मसेनाकडून इंग्लंडला मदत?

प्रत्येक संघासाठी 1-1 रीव्हीव्यूची किंमत काय असते, हे क्रिकेट चाहत्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. एक रिव्हीव्यू सामन्याचा निकाल बदलण्यात निर्णायक ठरतो. मात्र धर्मसेना यांनी इशाऱ्याद्वारे साईच्या पॅडआधी बॅटला बॉल लागल्याचं सांगितल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे इंग्लंडचा रिव्हीव्यू वाचला. धर्मसेना यांनी तशी कृती केली नसती तर इंग्लंडचा एक रिव्हीव्यू वाया गेला असता. त्यामुळे धर्मसेना यांच्या त्या कृतीमुळे इंग्लंडला मदत आणि भारतासोबत फसवणूक झालीय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कुमार धर्मसेना यांनी केलेल्या या कृतीमुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर टीका केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.