अर्शदीप सिंगला पदार्पणाची संधी का मिळाली नाही? हेच कारण तर नाही ना
Tv9 Marathi July 31, 2025 10:45 PM

इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना ओव्हल मैदानात सुरु झाला आहे. पाचव्या कसोटी सामन्यातही भारताला नाणेफेकीने साथ दिली नाही. सलग पाचव्या सामन्यात भारताला नाणेफेक गमवावी लागली आहे. त्यामुळे या सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागत आहे. इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण प्लेइंग 11 जाहीर केल्यानंतरक्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या महत्त्वाच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला आहे. त्यामुळे संघात अर्शदीप सिंगला संधी मिळेल असं वाटत होतं. पण टीम इंडियाने पुन्हा एकदा आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध कृष्णाला पुन्हा एकदा प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे. त्याने यापूर्वीच्या सामन्यात खूपच धावा दिल्या होत्या. त्याची गोलंदाजीही अचूक टप्प्यावर होत नव्हती. तरीही कर्णधार शुबमन गिलने त्याच्यावर विश्वास टाकला आहे. पण अर्शदीप सिंगला या सामन्यातही संधी का मिळाली नाही?

अर्शदीप सिंग या सामन्यासाठी पूर्णपणे फिट नसल्याचं बोललं जात आहे. मँचेस्टर कसोटी सामन्यापूर्वी त्याच्या हाताला दुखापत झाली होती. पण अर्शदीप सिंग ओव्हल मैदानात चांगली कामगिरी करू शकला असता. कारण अर्शदीप सिंगने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच रेड बॉल क्रिकेटमध्येही त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची आकडेवारी असंच सांगत आहे. त्याने आतापर्यंत 21 फर्स्टक्लास सामने खेळले. त्यात 66 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगने दोन वेळा पाच विकेट घेतल्या. यात 40 धावा देत सहा विकेट घेण्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

🚨 Toss and Team Update 🚨

England win the toss in the 5th Test and elect to field.

A look at #TeamIndia‘s Playing XI for the 5th and Final Test 👌👌

Updates ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#ENGvIND pic.twitter.com/fxzEfXEzLA

— BCCI (@BCCI)

अर्शदीप सिंगकडे चांगला अनुभव आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. अर्शदीप सिंग चेंडू स्विंग करण्यात पटाईत आहे. तसेच इंग्लंडच्या खेळपट्ट्यांचा त्याला चांगला अभ्यास आहे. अर्शदीप सिंग 2023 मध्ये केंटकडून काउंटी क्रिकेट खेळला आहे. यात 8 डावात त्याने 13 विकेट घेतल्या होत्या. अर्शदीपने इंग्लंडच्या वातावरणात एकूण 161.4 षटकं टाकली आहे. आता अर्शदीपला कसोटीत पदार्पण करण्यासाठी 60 दिवस वाट पाहावी लागणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही कसोटी मालिका ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार असून दोन सामने आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.