नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यावेळी वादाचा मुद्दा आहे माही मांडवी वसतिगृहातील जेवण व्यवस्था. वसतिगृह प्रशासनाने मेसमध्ये शाकाहारी (व्हेज) आणि मांसाहारी (नॉनव्हेज) जेवणासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटनांनी जोरदार नाराजी व्यक्त केली असून कॅम्पसचं वातावरण तापलं आहे.
निर्णयामुळे वादाची ठिणगी२८ जुलै २०२५ रोजी वसतिगृह प्रशासनाने एक नोटीस जारी केली. त्यात मेसमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही नोटीस लागल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वादंग पेटला. शाकाहारी व नॉनव्हेज जेवण वेगळे करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या समावेशक संस्कृतीवर घाला असल्याचा आरोप करण्यात आला.
'आधी पैसे द्या, मग बायकोला घेऊन जा!'; EMI न भरल्याने महिलेला जबरदस्तीने बँकेत बसवून ठेवल्याचा प्रकार, काय म्हणाला नवरा? जेएनयू विद्यार्थी संघटनेची (JNUSU) प्रतिक्रियाJNUSU ने हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांचं म्हणणं आहे, की हा निर्णय भेदभावपूर्ण धोरण आहे आणि कॅम्पसची एकता व परंपरा धोक्यात येईल. या निर्णयावरून दोन वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांमध्ये भांडण झाल्याचंही वृत्त आहे.
Mahadavi Elephant : 'महादेवी'च्या पायाला जखम; हत्तीणीचे चिमटे काढणाऱ्या माहुताचा 'तो' व्हिडिओ पाहून संताप, 'वनतारा'त ती सुरक्षित आहे? जेएनयूवर एक नजरजवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे नवी दिल्लीच्या दक्षिण भागात वसलेलं भारतातील प्रमुख केंद्रीय विद्यापीठ आहे.
स्थापना : सन १९६९ (संसदेत मंजूर कायद्यानुसार)
नाव : विद्यापीठाला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं नाव
कॅम्पस क्षेत्रफळ : सुमारे १०२० एकर परिसर
पहिले कुलगुरू : गोपालस्वामी पार्थसारथी
संस्थापक अध्यक्ष व रेक्टर : प्रो. मुनिस रझा