पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची कारवाई, एकनाथ खडसेंचे जावई खेवलकर ताब्यात
खेवलकर यांच्यावर ड्रग्स पार्टीत सहभागी असल्याचा आरोप
वकील आणि एथिकल हॅकरचा दावा – ट्रॅपमध्ये अडकवले
कॉल रेकॉर्ड आणि ब्लड टेस्टमधून सत्य बाहेर येण्याची शक्यता
पुण्यातील खराडी परिसरात पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. या पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. तसेच एकूण ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यात २ तरूणींचा समावेश होता. परंतु, या प्रकरणाबाबत खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे आणि एथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी खळबळजनक दावा केला आहे.
प्रसारमाध्यमांशीबोलताना विजयसिंह ठोंबरे म्हणाले, फ्लॅटमध्ये एकत्र आल्यावर त्याला रेव्ह पार्टी म्हणता येणार नाही. खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचा अंमली पदार्थांचे सेवन केलेलं नाही. हे बल्ड टेस्ट केल्यानंतर स्पष्ट होईल. त्यांच्यावर याआधीही २ वेळा पूर्वनियोजित पद्धतीनं ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. हे संपूर्ण प्रकरण बनावट आहे, असा दावा वकिलांनी केला आहे.
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलंतर, मनीष भंगाळे यांनी रेव्ह पार्टी छापाप्रकरणात गंभीर आरोप केला आहे. 'खेवलकर यांचा रेव्ह पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यांना त्या ठिकाणी कॉल करून बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर छापेमारी झाली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणात ज्या काही तांत्रिक बाबी समोर आल्या आहेत, जी माहिती गोळी केली आहे. त्यानुसार त्यांना स्पष्टपणे ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचं समजतंय. या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही', असा दावा एथिकल हॅकर यांनी केला आहे.
Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेत धुततसेच, पुणे पोलिसांनी चौकशी केल्यास आणि खेवलकरांचे कॉल रेकॉर्डस तपासून पाहिल्यास त्यांच्याविरोधात रचण्यात आलेला कट स्पष्ट होईल, असंही मनीष भंगाळे म्हणाले आहेत.