Amit Shah : चॉकलेट अन् मतदार ओळखपत्र..! अमित शाहांनी दिला अतिरेकी पाकिस्तानी होते याचा पुरावा, चिदंबरम यांना प्रत्युत्तर
esakal July 29, 2025 07:45 PM

what Amit Shah said about Pahalgam terror attack : पहलगामध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानमधून आले होते, याचा पुरावा काय? असा प्रश्न सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. भाजपासह अनेकांनी त्यांच्या विधानावरून काँग्रेसवर टीका केली आहे. महत्त्वाचे म्हणजे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही चिदंबरम यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

लोकसभेत सुरु असलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शहा यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली. अमित शहा म्हणाले, काल माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी पहलगामधील दहशतवादी पाकिस्तानमधून आले याचा पुरावा मागितला होता. अशा पुरावा मागणं दुर्दैवी आहे. सोमवारी ऑपरेशन महादेव दरम्यान पलगामध्ये हल्ला करणाऱ्यांना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांची ओळखही पटवण्यात आली आहे.

Amit Shah: पहलगामच्या आकांचा खात्मा कसा केला? अमित शहांनी लोकसभेत वेळ ठिकाण संपूर्ण ऑपरेशन सांगितलं

पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, पहलगामध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचे पुरावे सरकारकडे आहे. तीन पैकी दोघांचे पाकिस्तानातील मतदार ओखळपत्र सरकारकडे आहे. तसेच त्यांनी वापरलेली बंदुके आणि त्यांच्याकडे आढळेली च़ॉकलेटसुद्धा पाकिस्तानातील आहे. यावरून हे स्पष्ट होतं, की हे अतिरेकी पाकिस्तानातून आले.

Pahalgam Terror Attack: हल्लेखोर पाकिस्तानातूनच आले यावर विश्वास कसा ठेवायचा? पहलगाम हल्ल्यावर चिदंबरम यांच्या वक्तव्याने खळबळ

जेव्हा संसदेत चर्चा सुरु आहे. त्यावेळी चिदंबरम यांनी अशाप्रकारे मुद्दा उपस्थित केला. त्यांना नेमकं म्हणायचं काय आहे. आज देशाचे माजी गृहमंत्री पाकिस्तानला क्लिनचीट देत आहे. अशाप्रकारे प्रश्न उपस्थित करून पाकिस्तानवर हल्ला का केला, अशा प्रश्नही ते एकप्रकारे उपस्थित करत आहेत, अशी टीकाही अमित शहा यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.