‘ज्योतिबानगर येथील दुभाजक दुरुस्त करा’
पिंपरी, ता. २८ ः तळवडे ज्योतिबानगर येथील लोकेश ऑटोसमोरील दुभाजक रस्त्यावर पडल्याने शनिवारी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही झाले नाही. पण, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या बाबत वाहतूक पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी येऊन त्यांनी तत्काळ दुभाजक बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. भविष्यात होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने दुभाजक दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दुभाजक तुटलेल्या ठिकाणी सतर्कतेसाठी चेतावणी फलक लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.