एखाद्याचं व्यक्तिमत्व संपूर्ण रित्या जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीचे मूलांक माहिती करून घेणे महत्वाचे असते असे म्हटले जाते. अंकशास्त्रानुसार तुमचा मूलांक तुमच्याविषयी बरच काही सांगत असतो. हिंदू धर्मात मूलांकांना फार महत्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या वृत्तीबद्दल तसेच त्या व्यक्तीबद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी मूल्यांक फार महत्वाचे ठरतात. मूलांक म्हणजे व्यक्तीच्या जन्मतारखेतुन मिळणार अंक. आज आपण अशाच एका मुलांकाबद्दल जाणून घेणार आहोत.
अंकशास्त्रानुसार या मुलांकाची लोक खूप स्वाभिमानी असता
अंकशास्त्रानुसार या मुलांकाची लोक खूप स्वाभिमानी असता. कोणासमोर झुकणं त्यांना पसंत नसतं.हा मुलांक म्हणजे 3. ज्या लोकांचा जन्म 3,12,21 किंवा 30 रोजी झाला आहे, त्यांचा मूलांक 3 यतो. या मूलांकाचा अधिपती ग्रह गुरु आहे, जो सर्व ग्रहांचा गुरु मानला जातो.
3 अंकाचे लोक खूप स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी असतात. या लोकांना कोणासमोर झुकणे आवडत नाही. तसेच त्यांना कोणाचेही उपकार घेणे आवडत नाही. त्यांना त्यांच्या कामात कोणीही विनाकारण हस्तक्षेप केलेलाही आवडत नाही.
स्वतंत्र्य विचारांचे असतात
असे लोक मुक्त, स्वतंत्र्य विचारांचे असतात आणि त्यांना स्वातंत्र्याने जगणे आवडते. हे लोक धाडसी, शक्तिशाली आणि मेहनती असतात. हे लोक आव्हानांना घाबरत नाहीत. ते कोणतेही काम करण्याचा निर्णय घेतात, ते पूर्ण केल्याशिवाय ते विश्रांती घेत नाहीत.
त्यांच्या नात्याला खूप गांभीर्याने घेतात
3 मुलांकाचे लोक त्यांच्या नात्याला खूप गांभीर्याने घेतात. तथापि, त्यांच्या जोडीदाराकडून त्यांना खूप अपेक्षा असतात. तसेच 3 क्रमांकाचे लोक खूप चंचल मानले जातात.
या क्षेत्रात चांगले करिअर करू शकतात
3 अंकाचे लोक अभ्यासातही फार चांगले असतात. त्यांना घोडेस्वारी आणि नेमबाजीची आवड असते आणि ते या क्षेत्रात चांगले करिअरही करू शकतात. वयानुसार त्यांची आर्थिक स्थिती देखील सुधारते. त्यांचे त्यांच्या भावंडांशीही चांगले संबंध असतात. ते स्वभावाने विनम्र आणि मनमिळाऊ असतात.
लव्ह लाईफमध्ये अनेक चढ-उतार येतात
मात्र त्यांच्या लव्ह लाईफमध्ये अनेक चढ-उतार येतात पण त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी असते. त्यांचे एकापेक्षा जास्त लग्न होण्याची शक्यता असते आणि त्यांचे पहिले लग्न दुःखद असू शकते.