ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह हा ऐश्वर्य, सुख, कला, संपत्ती, पैसा आणि संगीत यांच्याशी संबंधित मानला जातो. गुरु ग्रहाला समृद्धी, अध्यात्म, यश आणि ज्योतिषशास्त्राचा कारक मानले जाते. तर सूर्यदेव हे सरकारी नोकरी, प्रशासन, वडील आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.
नोव्हेंबर महिन्यात हंस, मालव्य आणि बुधादित्य राजयोग निर्माण होत असल्याने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्याची शक्यता आहे. या काळात अचानक धनप्राप्ती आणि प्रगतीच्या संधी दिसत आहेत. चला, जाणून घेऊया कोणत्या राशी या भाग्यशाली ठरू शकतात.
मालव्य राजयोग मकर राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून लाभदायक ठरू शकतो. शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून कर्म स्थानात उच्च राशीत असेल, तसेच सातव्या स्थानात हंस राजयोग निर्माण होईल. या काळात नोकरदारांना कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, तसेच पदोन्नती किंवा पगारवाढीचा योग येऊ शकतो. अविवाहित व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
मालव्य, बुधादित्य आणि हंस राजयोगांमुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ काळ सुरू होऊ शकतो. मालव्य राजयोग तुमच्या राशीपासून नवव्या स्थानात, तर हंस राजयोग सहाव्या स्थानात तयार होईल. यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. परदेश किंवा देशांतर्गत प्रवासाचे योग येतील. शत्रूंवर मात करण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि रणनीती उपयुक्त ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून किंवा अनपेक्षित स्रोतातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होऊ शकता.
कर्क राशीच्या लोकांसाठी हंस, मालव्य आणि बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरू शकतात. हंस राजयोग तुमच्या लग्न स्थानात, तर मालव्य राजयोग चतुर्थ स्थानात निर्माण होईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक होईल. भौतिक सुख-सुविधा, वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग संभवतात. व्यवसायात एखादी करार फायदेशीर ठरेल. तसेच, या काळात आई आणि सासरच्या नातेवाईकांशी संबंध सुधारतील. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)