Shashikant Shinde: विरोधकांचा सत्तेचा माज उतरवण्यासाठी स्त्यावर उतरणार: शशिकांत शिंदे; उपेक्षितांचा आवाज होण्याचा प्रयत्न राहील
esakal July 29, 2025 04:45 PM

सातारारोड : कोरेगाव तालुक्यातील जनतेने मला आजवर दिलेले प्रेम आणि बळ मी कधीही विसरू शकणार नाही. कोरेगावकरांच्या आशीर्वादामुळेच मला पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत ‘आता राज्यभर काम करताना उपेक्षित घटकांचा आवाज होण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. विरोधकांना आलेला सत्तेचा माज उतरवायला आता आपल्याला रस्त्यावर उतरावेच लागेल,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना ठणकावले.

Success Story: 'संकटावर मात करत डॉ. आदित्य चिंचकर यांची युपीएससीत धडाकेबाज घोडदौड'; मिळवली ४० वी रँक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव येथे विधानसभा मतदारसंघाच्या वतीने माजी मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मानपत्र, छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा, शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन नागरी सत्कार झाला. अध्यक्षस्थानी माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर होते.

याप्रसंगी परळीचे दादासाहेब देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष यशवंत घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, सतीश चव्हाण, जोतिराम सावंत, काँग्रेसचे अजितराव चिखलीकर, मनोहर बर्गे, ॲड. श्रीकांत चव्हाण, संगीता जगदाळे, संजना जगदाळे, ॲड. पांडुरंग भोसले, जयवंत घोरपडे, हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनवडे, संगीता बर्गे, मंदा बर्गे, प्रशांत गुरव आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘देशाचे नेते शरद पवार यांच्या विचारांना प्रमाण मानून मी स्वाभिमानाने आणि निष्ठेने लढा देत राहिलो आहे. त्याचीच पोचपावती म्हणून पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. हे आव्हान आहे आणि माझी परीक्षा देखील आहे.’’

कोरेगावकरांना न्याय देणारच

आता राज्यभर काम करताना कोरेगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने मी निश्चितपणाने न्याय देईन. निवडणुकांची प्रक्रिया बदलली, ईव्हीएमच्या नावाखाली वेगळी स्थिती आली आहे. शिव- शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या या महाराष्ट्र राज्यात आपले सरकार असेल, ही भूमिका ठेवून आपण सर्व मिळून काम करूया, असेही श्री. शिंदे म्हणाले. आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व माथाडी चळवळीतून पुढे आले आहे. त्यांचा लढाऊ बाणा कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व जण पक्ष बळकट करण्यासाठी कार्यरत राहूया.’’ आमदार उत्तमराव जानकर म्हणाले, ‘‘सातारा हा स्वाभिमानी जिल्हा आहे. आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे, त्यासाठीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून शशिकांत शिंदे यांच्या हाती तलवार दिली आहे.’’ या वेळी दादासाहेब देशमुख, अजितराव चिखलीकर, सुनील माने, राजाभाऊ जगदाळे, सतीश चव्हाण, दिनेश बर्गे, संजय पिसाळ यांची भाषणे झाली. अमर बर्गे यांनी आभार मानले.

Success Story: शंकरबाबांची दृष्टिहीन कन्या माला झाली सरकारी अधिकारी; दत्तक कन्येला वडिलांचे नावच नाही, ममत्वही मिळालं माझ्यावर कार्यकर्त्यांचे ऋण

मी कार्यकर्त्यांवर उपकार करत नाही, तर कार्यकर्त्यांचे माझ्यावर ऋण आहेत. महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व एकत्र येऊ, असे नमूद करत स्थानिक राजकारणावर बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘दिलदारपणा असावा, मला पद मिळाले म्हणून बैठका घेऊन लोकांना अडकवून कारवाई करण्याची कार्यकर्त्यांना भीती दाखवली जातेय; पण संबंधितांना एवढेच सांगतो औकातीत राहा.’’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.