भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी नुकतेच भारताच्या ५ महान खेळाडूंची निवड केली आहे. शास्त्रींनी गेल्या ५ दशकामधील ५ खेळाडू निवडले आहेत.
शास्त्रींनी निवडलेल्या ५ खेळाडूंपैकी २ खेळाडू १९८३ वर्ल्ड कप विजेत्या, तर ३ खेळाडू २०११ वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिले आहेत.
डेव्हिड लॉयड, ऍलिस्टर कूक आणि मायकल वॉन यांच्यासोबत स्टिक टू क्रिकेट या पॉडकास्टमध्ये बोलताना ही निवड केली आहे.
शास्त्री यांनी सुनील गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली या पाच खेळाडूंची नावं घेतली.
शास्त्री यांनी या खेळाडूंमध्ये बिशन सिंग बेदी यांचे नाव नक्की विचारात होते, असंही म्हटलं. तसेच जसप्रीत बुमराह अद्याप युवा आहे आणि अजून क्रिकेट खेळू शकतो.
शास्त्री म्हणाले मी त्याच खेळाडूंची नावं घेतली, ज्यांची कारकिर्द आता जवळपास संपली आहे.
शास्त्री यांनी त्यांच्या कारकिर्दीतही ८० कसोटी आणि १५० वनडे सामने खेळले आहेत.