या कृत्यामुळे संताप व्यक्त झाला आहे आणि श्रद्धेच्या शोषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पंढरपूरातील मंदिर परिसरात भाविकांकडून पैसे घेऊन तीर्थ विक्रीचा प्रकार समोर
बीव्हीजी कंपनीचे खासगी सुरक्षा रक्षक चंद्रभागेचं पाणी विकत असल्याचं उघड
संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पावसामुळे पाणीपातळी वाढली असल्याने भाविकांना नदीत जाण्याची मनाई
भारत नागणे, साम प्रतिनिधी
पंढरपुरात भाविकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार समोर आलाय. भाविकांकडून पैसे घेऊन चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून विक्री केली जात आहे. मंदिर समितीकडे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकांनीच हा गोरखधंदा सुरू केल्याचं समोर आलंय. मंदिर परिसरातील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झालाय.
पंढरपुरात बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून भाविकांच्या भक्तीचा सौदा केला जात आहे. बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षक चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून विक्री करत आहेत. चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालीय. त्यामुळे महाद्वार घाटावरून नदीत उतरण्यास भाविकांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
या ठिकाणी बॅरिकेटिंग लावून बिव्हीजी कंपनीचे कंत्राटी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत. मात्र हेच सुरक्षारक्षक नदीतील पाणी भाविकांना तीर्थ म्हणून विकत आहेत. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
CM Fadnavis: वाद निर्माण झाला तर विचार करावा लागेल; पोस्ट कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंसह मंत्र्यांना झापलंदरम्यान बीव्हीजी कंपनीला मंदिर सुरक्षा रक्षकाचा ठेका मिळाल्यापासून ही कंपनी सतत वादात सापडत आहे. श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि प्रशासनाने या पूर्वीच्या घटनांवर कठोर कारवाई केली नसल्याने अशा घटना वाढत आहेत.
वारकऱ्याला काठीने मारहाणपंढरपुरात भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकानी बेदम मारहाण केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्याला सुरक्षा रक्षकाने मारहाण केली होती. पत्राशेड येथे दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाने मारहाण केली. यात भाविक रक्तबंबाळ झाला होता. या घटनेनंतर भाविकांनी संताप व्यक्त केला होता.