साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसणारी अभिनेत्री संभाजीनगरची लेक, कोण आहे ही मराठमोळी मुलगी?
Tv9 Marathi July 30, 2025 10:45 AM

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या किंग्डमची प्रचंड चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ज्याला पाहून लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटात अभिनेता एका गुप्तहेर एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण फक्त विजय देवरकोंडाचीच नाही तर त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्रीची देखील तेवढीच चर्चा होताना दिसत आहे. या अभिनेत्रीला इंडस्ट्रीत फारशी प्रसिद्धी मिळाली नाही, परंतु हा चित्रपट तिच्या कारकिर्दीसाठी गेम चेंजर ठरू शकतो.

या अभिनेत्रीचे नाव भाग्यश्री बोरसे असून ती मुळची संभाजीनगरची मराठमोळी मुलगी आहे. भाग्यश्री याआधी अनेक चित्रपटांचा भाग राहिली आहे, परंतु तिने कोणत्याही चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली नव्हती.

कारकिर्दीची सुरुवात

भाग्यश्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाले तर, तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. भाग्यश्री ही महाराष्ट्रातील संभाजीनगरची रहिवासी आहे. तथापि, तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. या अभिनेत्रीने तिचे शालेय शिक्षण दक्षिण आफ्रिकेतून केलं आहे, परंतु पदवीसाठी ती भारतात परतली. जेव्हा भाग्यश्रीने मॉडेल म्हणून आपली ओळख निर्माण केली तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. नंतर ती चित्रपटांकडे वळाली.

चित्रपट जगात पाऊल ठेवलं

2023 मध्ये, भाग्यश्रीने ‘यारियां 2’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने ‘राजलक्ष्मी’ची भूमिका साकारली होती. नंतर तिने दक्षिणेकडील चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली. 2024 मध्ये, भाग्यश्री ‘मिस्टर बच्चन’ या तेलुगू चित्रपटात दिसली, त्याच वर्षी ती कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातही दिसली. भाग्यश्री अभिनेता रवी तेजासोबत ‘मिस्टर बच्चन’ या तेलुगू चित्रपटात दिसली होती, परंतु या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीमध्ये विशेष ओळख निर्माण केली नव्हती. पण आता ती किंग्डममुळे चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhagyashri Borse (@bhagyashriiborse)


 हिंदीमध्ये हा चित्रपट ‘साम्राज्य’ नावाने प्रदर्शित

हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलुगूमध्ये हा चित्रपट ‘किंग्डम’ या नावाने प्रदर्शित होईल, तर हिंदीमध्ये हा चित्रपट ‘साम्राज्य’ या नावाने प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या ट्रेलरमधील अ‍ॅक्शन पाहून अंदाज लावता येतो की हा चित्रपट लोकांचे पूर्णपणे मनोरंजन करणार आहे.

ती ‘कंठा’ मध्येही दिसणार आहे.

भाग्याश्री अजून एका चित्रपटात दिसणार आहे ज्याचं नाव ‘कांथा’ आहे. हा चित्रपट दक्षिणेतील अभिनेता दुल्कर सलमानसोबत आहे, नुकताच या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. सेल्वराज सेल्वमणी दिग्दर्शित ‘कांथा’ हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दुल्कर सलमान आणि भाग्यश्री व्यतिरिक्त, समुथिरकणी देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर लोकांना चित्रपटाचा टीझर खूप आवडला आहे.

अल्लू अर्जुन सोबतचा चित्रपट

एवढेच नाही तर अभिनेत्रीचे इतरही प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत. ‘साम्राज्य’ आणि ‘कंथा’ व्यतिरिक्त, भाग्यश्री प्रसिद्ध चित्रपट निर्माते अॅटली यांच्या ‘AA22xA6’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एक मोठ्या बजेटचा चित्रपट असणार आहे. ‘AA22xA6’ मध्ये अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असेल. सध्या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhagyashri Borse (@bhagyashriiborse)


चित्रपट 31 जुलै रोजी प्रदर्शित

विजय देवरकोंडा आणि भाग्यश्री बोरसे यांचा किंग्डम हा चित्रपट 31 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची अभिनेत्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गौतम तिन्नानुरी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. किंग्डममध्ये विजय देवरकोंडा आणि भाग्यश्रीची नवीन जोडी दिसणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.