2016 मधला अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट, ज्याने जिंकले तब्बल 21 अवार्ड्स
Tv9 Marathi July 30, 2025 10:45 PM

बिग बी अमिताभ बच्चन यांचे चित्रपट हे सर्वांनाच आवडतात. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट हे सुपरहिट ठरले. जर तुम्हाला कायदेशीर थ्रिलर क्राइम ड्रामा चित्रपट आवडत असतील तर अमिताभ बच्चन यांच्या अशाच एका चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. हा चित्रपट एवढा सुपरहीट ठरला होता की या चित्रपटाने तब्बल 21 पुरस्कार जिंकले. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट एक थ्रिलर क्राइम ड्रामा आहे.

चित्रपटातील अमिताभ बच्चन  यांच्या भूमिकेचं कौतुक 

हा चित्रपट म्हणजे पिंक. या चित्रपटात तापसी पन्नू देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत तापसी पन्नू, क्रिती कुल्हारी, विजय वर्मा, अंगद बेदी आणि पियुष मिश्रा सारखे कलाकार पाहायला मिळतात आणि सोबतच त्यांचा दमदार अभिनय देखील पाहायला मिळाला. या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकांचे कौतुकही झालं. विशेष करून अमिताभ यांच्या भूमिकेबद्दल. त्यांच्या अभिनयामध्ये एक ठेहराव दिसून आला. त्यांची गंभीर पण बरंच काही सांगणारी भूमिका आहे.

या चित्रपटात बच्चन यांनी एका वकिलाची मुख्य भूमिका साकारली आहे. “पिंक” चित्रपटाची निर्मिती शूजित सरकार यांनी केली आहे आणि दिग्दर्शन बंगाली चित्रपट निर्माते अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केले आहे. तसेच जेव्हा या चित्रपटाचे शुटींग संपत आली होती तेव्ही अमिताभ बच्चन यांनी एक भावनिक पोस्टही शेअर केली होती.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारासह एकूण 21 पुरस्कार जिंकले

आयएमडीबीनुसार, या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारासह एकूण 21 पुरस्कार जिंकले आहेत. हा चित्रपट 2016 मधील हिट चित्रपटांपैकी एक होता. boxofficeindia.com नुसार, चित्रपटाचे बजेट 29 कोटी होते. तर, चित्रपटाने भारतात 89 कोटी 85 लाखांची कमाई केली.

चित्रपटाचं IMDB रेटिंग 8 आहे

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केलं होतं. चित्रपटाच्या लेखकांमध्ये शूजित सरकार, अनिरुद्ध रॉय चौधरी आणि रितेश शाह यांचा समावेश आहे. चित्रपटाचे IMDB रेटिंग 8 आहे. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओ आणि जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.