अलिकडेच युकेत स्विंगाथॉन नावाचा एक फेस्टीव्हल झाला होता आणि तो खूपच चर्चेत आहे. अशा प्रकारच्या झालेल्या एक्टीव्हीटीने खळबळ माजली आहे. काही लोकांनी या उपक्रमास अश्लील म्हणून टीका केली आहे. इंग्लंडच्या ग्रांथम जवळील एलिंग्टन नावाच्या एका गावातील खुल्या मैदानात एक तंबु उभारण्यात आला होता. इथे येणाऱ्या पाहुण्यासाठी आत छोटे-छोटे टेंट लावले होते. तसेच पोल डान्स आणि हॉट टब सारखे वेगवेगळ्या एडल्ट गेम्ससाठी विविध एक्टीव्हीटी विभागही तयार केले गेले होते.
डेली स्टारच्या बातमीनुसार या इंग्लंडच्या छोट्या गावाजवळ १७ ते १९ जुलैपर्यंत स्विंगाथॉन नावाचा हा फेस्टीव्हल साजरा झाला. येथे सिंगल आणि कपल्स असे दोन्ही प्रकारची लोक पोहचले होते.या फेस्टीव्हलमध्ये एंट्रीसाठी प्रति सिंगल २०० पाऊंड म्हणजे २३ हजार रुपये आणि प्रति कपल २५० पाऊंड म्हणजे २९ हजार रुपये तिकीट ठेवण्यात आले होते.
येथे येणारे लोक केवळ येथे आयोजित होणाऱ्या खेळ आणि एक्टीव्हीटीजमध्ये भाग घेऊ शकत होते असेच नाही तर एडल्ट टॉय स्टॉलवरुन हवे ते खेळणे पैसे देऊन खरेदी करु शकत होते. येथे वन नाईट स्टे सारखी देखील सुविधा होती. यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन येणेच गरजेचे नव्हते. तर एक सारखे विचार असणारे लोक सहज मिळत होते. त्यामुळे जर कोणी सिंगल असेल तर तो त्याच्या आवडत्या पार्टनर सोबत एक वा तीन दिवस किंवा तिन्ही दिवस वेगवेगळे पार्टनर निवडू शकत होता.
यंदाच्या स्विंगाथॉनला १००० लोक पोहचले होते. या फेस्टीव्हलला आजूबाजूचे लोक एक अश्लील कार्यक्रम मानत आहेत. तर २०२० पासून हा फेस्टीव्हलला आयोजित करणारे मॅथ्यू कोल यांचे म्हणणे आहे की हा कोणा स्विंगर्स समुदायाचा कोणता असा कार्यक्रम नाही की ज्यात वाटीत चाव्या ठेवून त्याची निवड करायला सांगितली जाते आणि अश्लिल संगीतावर अश्लिल चाळे चालतात.
हे एक सन्मानजनक आयोजन आहे असे या कार्यक्रमाचे आयोजक मॅथ्यू कोल यांचे म्हणणे आहे. येथे लोक आपल्या नॉर्मल जीवनापासून दूर काही वेळ काढून येथे येतात आणि जे हवे ते करतात,त्याची पद्धत सुरक्षित असते. हा एक प्रकारचा एडल्ट अल्टरनेटीव्ह लाईफस्टाईल इव्हेंट आहे. येथे लोकांसाठी वन नाईट स्टे सारख्या गोष्टीपेक्षा अधिक काही होऊ शकते. येथे नाते आणि मैत्रीची सुरुवात होते असे मॅथ्यू यांनी म्हटले आहे.
या इव्हेंटमध्ये भाग घेणारे कपल मॅट आणि त्यांची पत्नी स्टेसी हीचे म्हणणे आहे की स्विंगाथॉन कोणताही घाणेरडी एडल्ट पार्टी नाही. ही मोकळा विचार असणाऱ्या लोकांचा गोतावळा आहे. येथे दोस्ती आणि नाती सुरु होऊ शकतात. याचा उद्देश्य एक समावेशक सकारात्मक अनुभवा सोबत एका समुदायाला एकत्र आणणे आहे, जेथे मैत्री आणि नाती सुरु होतात.