संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमित्त पुरस्कार जाहीर
esakal July 30, 2025 11:45 PM

पिंपरी, ता. ३० : श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शनिवारी (ता.२) सायंकाळी ५ वाजता चिंचवड येथील प्रा. मोरे प्रेक्षागृह येथे विविध पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा होणार आहे.
संत सावता भूषण पुरस्कार संतोष लोंढे यांना, तर संत सावता कृषीरत्न पुरस्कार, हभप मुरलीधर भुजबळ (पुनावळे) व दिलीपमामा विधाटे (साळुंब्रे, ता. मावळ) या प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, यावर्षीचा संत सावता उद्योगरत्न पुरस्कार संजय जगताप यांना जाहीर झाला आहे. तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.