क्रॅश टेस्टमध्ये फूल मार्क्स, या आहेत भारताच्या 5 सर्वात सुरक्षित कार, पाहा कोणत्या ?
GH News July 31, 2025 12:08 AM

भारतीय आता कार खरेदी करताना सेफ्टीला जास्त महत्व देत आहेत. हे ध्यानात घेत सरकारने २०२३ मध्ये ‘भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम’ (Bharat NCAP) सुरु केला आहे. हा एक ग्लोबल NCAP मानकांवर आधारित एक टेस्टींग प्रोग्रॅम असून यात आतापर्यंत २० कारची सेफ्टी टेस्टींग झाली आहे . आता आपण Bharat NCAP द्वारा टेस्ट केलेल्या ५ सर्वात सुरक्षित कारची यादी देणार आहोत. ज्यांना वयस्क सुरक्षा (AOP) स्कोर आधारे रँक केलेले आहे. या सर्व कारमुळे लहान मुलांची सुरक्षेत (COP) देखील ४५/४९ असा चांगला स्कोअर मिळवला आहे.

महिंद्रा थार रॉक्स (AOP स्कोअर:31.09/32)

महिंद्रा थार रॉक्सने नोव्हेंबर २०२४ मध्ये Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेंटींग मिळवली आहे, ही रेटींग सुव्हच्या सर्व व्हेरीएंट्सवर लागू होते. थार रॉक्समध्ये ६ एअर बॅग्स , ISOFIX चाइल्ड सीट एंकर्स, ESC सिस्टम,टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) आणि ADAS (काही टॉप व्हेरिएंट्समध्ये ) सारख्या चांगल्या सेफ्टी सुविधा दिलेल्या आहेत. महिंद्राने या मॉडेलला ऑफ रोड क्षमतेसह हाय सेफ्टी मानकांवर देखील फोकस करुन डिझाईन केले आहे. महिंद्रा थार रॉक्स (AOP स्कोर: 31.09/32)

टाटा पंच EV (AOP स्कोअर: 31.46/32)

टाटा पंच EV ने मे २०२४ मध्ये Bharat NCAP टेस्ट ५ स्टार रेटींग मिळवली असून जी या टेस्टमध्ये यश मिळवणारी प्रमुख इलेक्ट्रीक कारपैकी एक आहे. या कारमध्ये ६ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्रॅम (ESP),हिल होल्ड असिस्ट, ISOFIX चाईल्ड सीट माऊंट्स आणि TPMS स्टँडर्ड फिचर्स आहेत.

महिंद्रा BE 6 (AOP स्कोअर: 31.97/32)

महिंद्राच्या या इलेक्ट्रीक सुव्ह BE 6 ने जानेवारी २०२५ मध्ये NCAP टेस्टमध्ये 5 स्टार रेटींग मिळविली आहे. BE 6 च्या टॉप व्हेरिएंट पॅक थ्रीचे टेस्ट घेतली गेली होती. परंतू ही रेटींग सर्व व्हेरिएंटना लागू होते. या इलेक्ट्रीक वाहनात 6 एअर बॅग्स, रिअर व्यू कॅमेरा, पार्किंग सेंसर्स, TPMS आणि ड्रायव्हर ड्रोजनेस डिटेक्श सिस्टीम सारख्या सेफ्टी सुविधा दिलेल्या आहेत.

महिंद्रा XEV 9e (AOP स्कोअर: 32/32)

महिंद्रा XEV 9e ने जानेवारी 2025 मध्ये Bharat NCAP टेस्टमध्ये वयस्क सुरक्षेत (AOP) 32/32 गुण मिळवले आहेत. ही कूप-स्टाईल इलेक्ट्रिक SUV तिच्या बेस व्हेरिएंट ‘पॅक वन’पासूनचे ६ एअर बॅग्सस, ISOFIX माऊंट्स,रिअर डिस्क ब्रेक आणि TPMS सारख्या सुविधा देते, XEV 9e चे मजबूत बॉडी स्ट्रक्चर आणि दमदार सेफ्टी फिचर्समुळे भारतीय बाजारातील ही सर्वात सुरक्षित इलेक्ट्रीक कार पैकी एक आहे.

टाटा हॅरिअर EV (AOP स्कोअर: 32/32)

टाटा हॅरियर EV ने जून 2025 मध्ये Bharat NCAP टेस्टमध्ये वयस्क सुरक्षेत (AOP) 32/32 गुण मिळवले आहेत. ही टाटाची फ्लॅगशिप इलेक्ट्रीक SUV सर्व व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅग्स, ESC, ISOFIX चाईल्ड सीट माऊंट्स आणि सर्व आसनांसाठी पॉईंट सीट बेल्ट्स देते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.