संन्यास घेऊन जगले, लोक वाईट नजरेने बघायचे, आज मी… निकाल ऐकताच साध्वी प्रज्ञासिंह यांना कोसळलं रडू
Tv9 Marathi July 31, 2025 06:45 PM

संपूर्ण देशाच लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव बॉम्ब स्फोट खटल्याचा निकाल लागला आहे. तब्बल 17 वर्षानंतर NIA कोर्टाने हा निकाल दिला आहे. मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. या बॉमस्फोट प्रकरणात 6 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, 100 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. आज न्यायाधीश एके लाहोटी यांच्या कोर्टाने निकाल दिला. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुख्य आरोपी होत्या. आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. आज विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यावर आता साध्वी प्रज्ञा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा ?

साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, ‘मला जेंव्हा तपसयंत्रांनी बोलावल तेंव्हा मी सहकार्याच्या भावनेने आले होते. पण मला पोलीस कोठडीत ठेवेल अपमान केला मारहाण केली.’ कोर्टासमोर बोलताना साध्वी प्रज्ञाना रडू कोसळल. पुढे त्या म्हणाल्या, ‘माझा समाजात अपमान झाला. पूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले पण मला लोक वाईट नजरेने बघायचे, अपमानित करायचे... माझ्यावरून भगव्या रंगला कलंकित केल गेल. १७ वर्षात मी पहिल्यांदा आनंदी झाले आहे. अपमानच आयुष्य मी १७ वर्षे जगत होते. भगवाला आतंकवाद बोलल आज भगव्याचा विजय झाला हिंदुत्वाचा विजय झाला.‘

वाचा: महाराष्ट्र हादरला! महिलांना जंगलात नेऊन संबंध ठेवायचा, इच्छा पूर्ण होताच बनायचा यमराज; असा क्रूर खूनी कधी पाहिला नसेल

‘ज्यानी भगव्यावर अत्याचार केला त्यांना देव शिक्षा देईल. मी आता प्रसन्न आहे. मी आपले आभार मानते, धन्यवाद देते. निर्दोष सुटूनही सामाजिक जीवनात जे नुकसान झालेल आहे त्याच काय करायचं. राकेश धावडे यांच्या मुलाला शाळेत प्रवेश दिला जात नव्हता. राकेश धावडे यांच्या पत्नीने नाव बदललं तेंव्हा त्यांचा मुलाचा शाळेत प्रवेश झाला‘ असं त्या म्हणाल्या.

साध्यी प्रज्ञावर काय आरोप होता?

साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आरोप होता. या स्फोटासाठी वापरलेली मोटारसायकल त्यांच्या नावावर होती. बॉम्बस्फोटाच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. सध्या त्या जामीनावर बाहेर असून त्या भाजपच्या खासदार होत्या. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरसह सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.