पिंपरी, ता. २९ ः श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे पिंपरी-चिंचवड शहरात गेल्यावर्षी झालेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत थेरगावमधील श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने सर्वांगीण उत्कृष्ट गणेश मंडळ गटात प्रथम क्रमांक पटकावला. या मंडळाला ५१ हजार रुपये आणि करंडक देण्यात येईल.
शिक्षण, रोजगार, पर्यावरण, वैद्यकीय उपक्रम, सामाजिक सलोखा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील उपक्रमांमुळे या मंडळांची निवड झाली, अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या गुरुवारी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पुरस्कार वितरण होईल. या स्पर्धेत शहरातील २१५ मंडळे, ३२ गृहनिर्माण संस्था आणि १३ शाळा असे एकूण २६० स्पर्धक सहभागी झाले. त्यातील ९६ बक्षीसपात्र स्पर्धकांना एकूण १३ लाख ८३ हजार रकमेची बक्षीसे दिली जातील.
गटवार निकाल ः
गटवार सर्वांगिण उत्कृष्ट गणेश मंडळे (क्रमांक अनुक्रमे)
- गणेश मंडळे ः १. श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मंडळ (थेरगाव), २. कै.दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळ (भोसरी), ३. चिंतामणी मित्र मंडळ (चिंचवडगाव), ४. भैरवनाथ मित्र मंडळ (आकुर्डी), ५. भैरवनाथ तरुण मंडळ (पिंपळे गुरव)
शालेय ः १. प्रेरणा माध्यमिक तुकाराम गुजर कनिष्ठ महाविद्यालय (थेरगाव, देखावा ः मला माझा भारत देश विकायचाय), २. केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल (आकुर्डी), ३. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय (आकुर्डी), ४. बापुरावजी घोलप माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय (आकुर्डी), ५. नृसिंह हायस्कूल , जुनी सांगवी
- गृहनिर्माण संस्था ः १. भोंडवे एम्पायर सांस्कृतिक मंडळ (देखावा ः राजगडाचा नगारखाना), २. सुखवानी इनक्लेव सोसायटी (पिंपरी गाव), ३. जयराज रेसिडेन्सी (फेज १, जुनी सांगवी), ४. शुभारंभ सोसायटी (जाधववाडी), ५. शुभम सोसायटी (निगडी)
- पर्यावरणीय मंडळे ः १. गणेश मित्र मंडळ (तळवडे), २. संत नगर मित्र मंडळ (मोशी), ३. नवयुग मित्र मंडळ (रुपीनगर).
- महोत्सवी मंडळे ः १. समर्थ हनुमान मित्र मंडळ (कापसे आळी), २. ज्ञानदीप मित्र मंडळ (चिंचवड), ३. पवना मित्र मंडळ (पिंपरी), ४. श्री शिव छत्रपती तरुण मंडळ (किवळे), ५. सुदर्शन मित्र मंडळ (पिंपरी), ६. जय महाराष्ट्र मित्र मंडळ (आकुर्डी), ७. नवनाथ मित्र मंडळ (कासारवाडी), ८. महाराणा प्रताप मित्र मंडळ (फुगेवाडी), ९. श्री संत सावतामाळी तरुण मंडळ (भोसरी), १०. वीर अभिमन्यू मित्र मंडळ (चिखली), ११. परशुराम मित्र मंडळ (रामनगर)
------