मालेगाव बॉम्बस्फोट केसमधून निर्दोष सुटका, कोण आहे साध्वी प्रज्ञासिंह?
Sarkarnama July 31, 2025 11:45 PM
Sadhvi Pragya Singh Thakur मालेगाव स्फोट

29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मालेगावच्या भिक्खू चौकात भीषण स्फोट झाला.

Sadhvi Pragya Singh Thakur 6 मुस्लीम नागरिकांचा मृत्यू

या स्फोटात 6 निष्पाप मुस्लीम नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते.

Sadhvi Pragya Singh Thakur साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक

संशयाच्या आधारावर साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती. 9 वर्षं तुरुंगात काढल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.

Pragya Singh Thakur 17 वर्ष चालली केस

तब्बल 17 वर्ष कोर्टात ही केस सुरु होती. 31 जुलै 2025 ला मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने याप्रकरणात निकाल दिला.

adhvi Pragya Singh Thakur साध्वी यांच्यासह सर्वांची निर्दोष मुक्तता

केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येणार नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

adhvi Pragya Singh Thakur जन्म मध्यप्रदेश

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा जन्म मध्यप्रदेशच्या चंबल येथे झाला. तिथेच त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील आरएसएसचे स्वयंसेवक होते व पेशाने डॉक्टर होते.

adhvi Pragya Singh Thakur आरएसएस मध्ये काम

साध्वी महाविद्यालयीन काळापासून आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होत्या. आरएसएस आणि अखिल भारतीय हिंदू परिषदेमध्ये त्यांनी काम केलं.

adhvi Pragya Singh Thakur राजकारणात प्रवेश

स्वामी अवधेशानंद यांच्याकडून साध्वी यांनी संन्यास घेतला आणि राजकारणात प्रवेश केला.

adhvi Pragya Singh Thakur भाजपच्या खासदार

2019 मध्ये लोकसभेला त्या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढल्या. भोपाळमधून खासदार म्हणून निवडून आल्या.

Namo Drone Didi Scheme NEXT : महिलांना मिळणार टेक्नोलॉजीची साथ; नमो ड्रोन दीदी योजना'ने खुले होतील रोजगाराचे दार येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.