फिनोलेक्सच्या विद्यार्थ्यांची
चौगुले कंपनीत निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या सात विद्यार्थ्यांची चौगुले लावगण शिपरिपेअर प्रा. लि. या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली. या कंपनीमध्ये फिनोलेक्स अॅकॅडमीच्या मेकॅनिकल शाखेतील यश घाडी, तन्मय बाणे, वरद पाध्ये, ऋषिकेश सुवारे, ओंकार कुंभार, मानस कीर व इलेक्ट्रिकल शाखेतील अक्षय वरक या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. चौगुले लावगण शिपरिपेअर प्रा. लि. ही जहाज दुरुस्ती आणि संबंधित अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपनी आहे. ही भरती प्रक्रिया संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकाराने यशस्वीपणे पार पडली. या उल्लेखनीय यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा डॉ. अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.