पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(पीएमआरडीए) अंतर्गत असलेल्या गावांना भविष्यात पाण्याचा तुटवडा भासणार आहे. त्यासाठी आतापासून उपाययोजना करावी लागणार आहे. त्यानुसार नुकतीच पीएमआरडीएअंतर्गत सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) बैठक घेतली. त्यात पाण्याचा, मलनिस्सारण वाहिनी याचा आढावा घेतला. त्यानुसार भविष्यात उपाययोजना कराव्या लागणार असल्याची या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
गावामध्ये मिळणारे पाण्याबाबत जलसंपदा विभाग, एमआयडीसी यांच्याकडून मिळणारे पाणी, सध्याची स्थिती याची माहिती घेतली. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री तथा पीएमआरडीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्ह्यातील एकूणच पाणी वाटपासंदर्भात बैठक झाली होती.
त्याच्या सूचनेनुसार नव्याने पाण्याचा आढावा घ्या, असे सुचवले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यातच पीएमआरडीमध्ये ही बैठक झाली. त्यात पीएमआरडीएअंतर्गत येणारे नगरपंचायत, नगरपरिषदेचे अधिकारी, सीईओ हे उपस्थित होते.