पृथ्वी हा फारच रहस्यमयी ग्रह आहे. इथे जीवसृष्टी आहे. पण याच पृथ्वीवर अशी काही ठिकाणं आहेत, जी पाहिल्यावर तुम्ही थक्क होऊन जाता. आजदेखील काही प्रदेश असे आहेत, जिथे माणूस पोहोचू शकलेला नाही. शास्त्रज्ञांना याआधी काही अचंबित करून टाकणारे शोध लागलेले आहे. सध्या अशाच एका अजब गजब शोधाची जगभरात र्चर्चा होत आहे. संशोधकांना मोठ्या डोंगरांमध्यते एक विशाल असा दरवाजा सापडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संशोधकांना हा शोध पूर्व कजाकस्तान येथील डुंगगरीयन अलाताऊ या डोंगरात लागला आहे. या डोंगरात संशोधकांना एक विशाल असा गूढ दरवाजा सापडला आहे. हा दरवाजा प पाहून सगळेच हैराण होत आहेत. ओबढ-धोबड दरवाजामध्ये दरवाजाप्रमाणे ही आकृती आढळून आल्याने वैज्ञानिक तसेच सामान्यांत मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. या दरवाजासारख्या गूढ आकृतीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मोठ्या डोंगरांमध्ये ही आकृती कोरीव दरवाजाप्रमाणे भासत आहे. या आकृतीची निर्मिती माणसांनीच केलेली आहे, असे काही वैज्ञानिकांचे मत आहे. त्यामुळे प्राचीन कबर, मंदीर किंवा एखाद्या जुन्या शहराचे हे प्रवेशद्वार असावे, असाही अंदाज व्यक्त केला जातोय. या दरवाजासारख्या दिसणाऱ्या आकृतीची लांबी आणि रुंदी अनेक मीटर आहे. विशेष म्हणजे एखाद्या मानवाने कोरल्याप्रणाणे ही आकृती रेखीव वाटत आहे.
या भागात इतिहासात मानवाने कोणत्याही मोठ्या इमारतीची, वास्तूची किंवा अन्य कशाचीही निर्मिती केल्याची नोंद नाही. असे असताना या भागात अगदी रेखीव दरवाजाप्रमाणे भासणारी आकृती आढळल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डुंगगरीयन अलाताऊ हा प्रदेश कझाकस्तान आणि चीन सीमेजवळ आहे. या भागात फारच कमी पुरातत्त्वीय शोध लागलेले आहेत. असे असताना या भागात ही गूढ दरवाजासारखी आकृती दिसल्याने हा शोध विशेष असल्याचे म्हटले जात आहे. काही अभ्यासकांच्या मते ही आकृती म्हणजे एखाद्या संस्कृतीचा अवशेष असू शकतो. तर काही लोकांच्या मते हा सोडून दिलेला रॉक कट स्ट्रक्चरचा एक भाग आहे. सध्या कझाकस्तानचा पुरातत्व विभाग या सापडलेल्या गूढ आकृतीचा अभ्यास करत आहे.