मध्यमवर्गीयांसाठी होंडाने लाँच केली स्वस्त बाईक, Hero Xtreme करणार स्पर्धा
GH News August 01, 2025 06:15 PM

होंडाने नुकतंच भारतीय बाजारात CB125 Hornet आणि Shine 100 DX या बाईक लाँच केल्या होत्या. आता त्या गाड्यांची किंमत जाहीर केली आहे. होंडाने CB125 Hornet या गाडीची सुरुवातीची किंमत 1.21 लाख (एक्स शोरूम ), तर Shine 100 DX या गाडीची सुरुवातीची किंमत 74,959 रुपये (एक्स शोरूम ) ठेवली आहे. या दोन्ही गाड्यांची डिलिव्हरी ऑगस्ट 2025 च्या मध्यात सुरु होईल. म्हणजेच 15 ऑगस्टनंतर डिलिव्हरी मिळेल. या गाडीच्या बुकींगसाठी होंडाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा होंडाच्या डिलरशिपकडे जाऊन बूक करू शकता.

CB125 Hornet गाडीबाबत जाणून घ्या

CB125 हॉर्नेट ही कम्यूटर स्पोर्ट्स सेगमेंटमधील होंडाची नवी कोरी गाडी आहे. पाहता क्षणीच ही गाडी स्पोर्टी वाटते. बाईकला पूर्ण एलईडी लाइटिंग सेटअप आहे. टूथ होंडा रोडसिंकसह 4.2 इंचाचा टीएफटी डिस्प्ले दिला आहे. टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट देतो. यात शार्प, मस्कुलर डिझाईन इंधन टाकी आणि आकर्षक रंग तरुणांचं लक्ष वेधून घेत आहे. युएसडी फ्रंट फोर्क्स सोनेरी रंगामुळे अधिक आकर्षक दिसतो.माजच्या बाजूला 5 स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक आहे. त्यामुळे गाडी खड्डे असलेल्या रस्त्यावर जास्त हाचके देणार नाही.

CB125 हॉर्नेटमध्ये 123.94 सीसी, सिंगल-सिलेंडर, फ्युएल-इंजेक्टेड, OBD2-कंप्लायंट इंजिन आहे. यामुळे 7500 आरपीएमवर 8.2 किलोवॅट आणि 6000 आरएमपीवर 11.2 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. होंडाचा दाव्यानुसार फक्त 5.4 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. दुसरीकडे, यूएसबी टाइप-सी चार्जर, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ आणि सिंगल-चॅनेल एबीएससह फ्रंट डिस्क ब्रेक समाविष्ट आहे.

Shine 100 DX ही पण कम्युटर बाईक आहे. अपडेटेड मॉडेलमध्ये क्रोम डिटेलिंगसह नव्याने डिझाईन केलेले हेडलॅम्प, इंधन टाकी, नवीन ग्राफिक्स आहे. लांबलचक सीट असल्याने दोघं आरामात बसू शकतात. यात डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असून रिअल-टाइम मायलेज आणि सर्व्हिस रिमाइंडर्स दर्शवते. या गाडीचं इंजिन हे 98.98 सीसी, सिंगल-सिलेंडर, इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे. तसेच होंडाच्या eSP (एनहान्स्ड स्मार्ट पॉवर) सह येते. हे इंजिन 7500 आरपीएम वर 5.43 किलोवॅट आणि 5000 आरपीएम वर 8.04 एनएम टॉर्क निर्माण करते. तसेच 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.