लिव्हिंग रूम हवी नेटकी, सुंदर
esakal August 02, 2025 09:45 AM

लिव्हिंग रूम म्हणजे दिवाणखाना हे घराचे हृदय असते, जिथे कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवला जातो. ही खोली नेटकी, सुंदर आणि व्यवस्थित हवी. त्यासाठीच्या काही टिप्स बघूया.

रंगसंगतीची योग्य निवड

  • लिव्हिंग रूमला तुलनेने फिकट आणि उत्साहवर्धक रंग (जसे की क्रीम, पांढरा, पिवळा, पॅस्टल टोन) देणे जागेला मोठी आणि प्रकाशमय दिसण्यास मदत करते.

  • फर्निचर आणि पडद्यांचे रंग भिंतीच्या रंगांशी जुळणारे असावेत.

फर्निचरची योग्य मांडणी

  • सोफा आणि खुर्च्या अशा प्रकारे ठेवा, की संभाषणासाठी कोणालाही सारखेसारखे वळावे लागू नये.

  • जागेच्या मध्यभागी कॉफी टेबल, किंवा सेंटर टेबल ठेवा आणि सोफ्यापासून ते योग्य अंतरावर ठेवा.

  • या खोलीत फर्निचरची जास्त गर्दी करू नका. ‘लेस इज मोअर’ हे तत्त्व पाळा.

प्रकाशयोजना

  • नैसर्गिक प्रकाशावर भर द्या. जास्तीत जास्त खिडक्या उघड्या ठेवा आणि हलके पडदे वापरा.

  • लेअर्ड लायटिंगसाठी ॲम्बिएंट (छतावरील लाइट्स), टास्क (रिडिंग लॅम्प्स), अॅक्सेंट लाइटिंग (वॉल लाइट्स, एलईडी स्ट्रिप्स) यांचे मिश्रण करा.

  • सेंटर पीस म्हणून स्टेटमेंट लाइट (जसे की चांदीचा झुमका किंवा मॉडर्न पेंडंट लाइट) वापरा.

भिंतींवर डेकोरेशन

  • फोटो फ्रेम्स, वॉल आर्ट, आरसे किंवा वॉल शेल्फ्स यांचा नेमका आणि कल्पक वापर करा.

  • कुटुंबातील सदस्यांचे फोटो ग्रुपने लावणार असाल, तर विशिष्ट पॅटर्न आणि संतुलन वापरा.

वनस्पतींचा वापर

  • स्नेक प्लांट, मनी प्लांट, किंवा फ्लॉवरिंग प्लांट्स ठेवून निसर्गाचा स्पर्श द्या.

  • हँगिंग प्लांटर्स किंवा वॉल-माउंटेड प्लांटर्स वापरून जागा वाचवा.

वैयक्तिक सर्जनशीलता

  • फॅमिली फोटो, प्रवासात मिळणारे सुवेनिअर्स किंवा तुम्ही तयार केलेल्या कलाकृती, चित्रे यांचा वापर करून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटेल असे बघा.

  • बुकशेल्फमध्ये आवडती पुस्तके, कॅंडल्स आणि तुमची सर्जनशीलता दाखवणारे डेको आयटेम्स ठेवा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.