पिंपरी चिंचवड: पिंपरी मार्केटमध्ये भर दिवसा भर बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन व्यापारावर गोळीबार केला, या घटनेत व्यापारी तरुणाच्या पायाला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारात व्यापारी जखमी झाला आहे. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. मात्र, गोळीबार का झाला? हे तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
गोळीबाराच्या घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरलं आहे. पिंपरी कॅम्प मार्केट परिसरात आज दुपारी एका वीस वर्षाच्या व्यापारी तरुणावर दुचाकी वाहनावर आलेल्या एका अज्ञात गुन्हेगाराने गोळीबार केला आहे. व्यापारी तरुणावर गोळीबार करून गुन्हेगारांने त्याच्या गळ्यातील सोन्याच्या ऐवज देखील पळवला आहे. भावेश कंकरानी या व्यापारी तरुणावर त्यांच्या दुकानासमोर अज्ञात गुन्हेगाराने गोळीबार केला आहे. गोळीबार झाल्याने भावेश कंकरानी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पिंपरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र भर दिवसा भर बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. व्यापारी तरुणावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी केली आहे. मात्र, चोरीच्या उद्देशाने हा गोळीबार केला की दुसऱ्या कोणत्या कारणास्तव हे चौकशीअंती समोर येण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा