West Bengal SIR Process : बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR, Special Intensive Revision) प्रक्रियेवरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. विरोधक दररोज निवडणूक आयोगावर दबाव आणत असून, आता हा वाद पश्चिम बंगालपर्यंत पोहोचला आहे.
राज्यात SIR प्रक्रिया राबविण्याची मागणीपश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Shuvendu Adhikari) यांनी राज्यातही SIR प्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे. त्यांनी मोठा आरोप करताना सांगितलं की, राज्यातील सुमारे एक कोटी मतदार बेकायदेशीर आहेत. यामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांसह मृत, दोन ठिकाणी नोंदणीकृत आणि बनावट मतदारांचा समावेश आहे. त्यांनी हे सर्व नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Education Minister : शिक्षणमंत्री पडले बाथरूममध्ये, मेंदूत आढळल्या रक्ताच्या गुठळ्या, प्रकृती गंभीर; राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण प्रत्येक बूथवर ५० मृत मतदार असल्याचा आरोपसुवेंदू अधिकारी म्हणाले, 'प्रत्येक बूथवर सुमारे ५० मृत मतदार आणि ५० दोन ठिकाणी नोंदणीकृत मतदार आहेत. त्याचबरोबर बांगलादेशी आणि रोहिंग्या मतदारांचाही समावेश या यादीत आहे. निवडणूक आयोगाने ही सर्व बनावट नावे काढून मतदार यादी स्वच्छ करावी.'
'मुक्या जीवाचा खेळ केला, पैशांचं आमिष दाखवलं, पण अख्ख्या नांदणीचा जीव असलेली माधुरी ते कशी विकतील?' किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत २०२६ मध्ये होणार विधानसभा निवडणुकापश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी म्हणजेच, २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यातील २९४ विधानसभा जागांवर निवडणूक लढवली जाईल. मागील निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सत्ता राखली होती, तर भाजपला ७७ जागा मिळाल्या होत्या. यावेळी पुन्हा एकदा सत्तेसाठी तृणमूल आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.