दिल्लीत मोठ्या घडामोडी, PM मोदींनंतर गृहमंत्री शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; एकाच दिवशी भेटीचं कारण काय?
esakal August 04, 2025 07:45 AM

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली होती. यावरून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, आता एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानं दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Mahadevi Elephant : सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाहीय, महादेवीबद्दल सरकारच्या भूमिकेवर स्पष्टीकरण देताना फडणवीसांनी झटकले हात

दिल्लीत सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रपती भवनाकडून सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट झाल्याची माहिती देण्यात आलीय. दोघेही वेगवेगळे भेटीला गेले होते.

पंतप्रधान आणि गृहमंत्री भेटीला गेल्याचं राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आलं असलं तरी कशाबद्दल ही भेट होती याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एकाच दिवशी दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानं याची चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली अशी पोस्ट राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आलीय.

दोन रुपयेवाल्या डॉक्टरांचं निधन, वयाच्या ८०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यातच विरोधकांकडून बिहामध्ये एसआयआर आणि निवडणूक आयोग प्रकरणी केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून एसआयआऱ प्रक्रिया सुरू आहे. यात मतदारांची पुर्नतपासणी केली जात आहे. याशिवाय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच उपराष्ट्रपतीपदाचा धनखड यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक निश्चित करण्यात आलीय. त्यामुळे ही भेट घेतली असंही मानलं जातंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.