hawaiian petroglyphs : या पृथ्वीतलावर कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधीकधी पृथ्वीवर अशा काही अचंबित करणाऱ्या घटना घडतात, ज्यांना पाहून आपण थक्क होऊन जातो. सध्या अमेरिकेतली हवाई येथे एक सर्वांनाच अचंबित करून टाकणारी घटना घडली आहे. हवाई येथील एका बीचवर तब्बल 1000 वर्षांपूर्वीची एक गोष्ट दिसली आहे. हे दृश्य पाहून तेथील रहिवासी भयभीत झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या हवाई येथील ओआहू बेटावरील पोआकाई खाडीच्या किनारी साधारण दहा वर्षांनी रहस्यमयी प्राचीन चिन्हे दिसून आली आहेत. ही चिन्हं पाहून हवाई येथील स्थानिकांत एकच खळबळ उडाली आहे. तेथील स्थानिक लोक या चिन्हांचा संबंध रशियात नुकतेच आलेल्या भूकंपाशी जोडत आहेत.
या गूढ चिन्हांबाबत WION ने एक सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार हवाई येथील ओआहू बेटावरील पोआकाई खाडीवर साधारण 1000 वर्षांपूर्वीचे 26 रहस्यमयी चिन्ह पुन्हा दिसले आहेत. या चिन्हांचा संबंध आता रशियातील भूकंपाशी जोडला जात आहे. हे चिन्ह साधारण 10 वर्षांनंतर दिसले आहेत. ही चिन्हं दिसणं म्हणजे आपल्या पूर्वजांनी दिलेले संकेत आहेत, अशी हवाई येथील लोकांची भावना आहे. समुद्रात होणारे बदल आणि नैसर्गिक आपत्तीचे संकेत यातून मिळतात, असं तेथील लोकांना वाटतं.
दहा वर्षांनी दिसलेली ही 26 चिन्हे 1400 इ.सनापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. 23 जुलै रौजी समुद्राची भरती कमी झाल्यानंतर हे चिन्ह दिसून आले. त्यानंतर 30 जुलै रोजी रशियात कामचटका येथे भूकंप आला. या भूकंपामुळे जपानमध्येही त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. सध्या दिसून आलेली ही चिन्हे बेटावरच्या रेतीमुळे दबलेली असतात. मात्र मे आणि नोव्हेंबरच्या काळात समुद्राच्या लाटांमुळे ही चिन्हे दिसायला लागतात. 2016 नंतर पहिल्यांदाच ही चिन्हे पुन्हा दिसू लागली आहेत. या 26 चिन्हांपैकी साधारण 18 चिन्हे ही माणसांच्या आकाराची आहेत. तर 8 चिन्ह हे पुरुषांच्या जननेंद्रीयाप्रमाणे भासतात. ही सर्व चिन्हे 115 फुटांच्या परिसरात आहेत. समुद्राची भरती कमी झाली की पर्यटक ही रहस्यमयी चिन्हे पाहायला येतात.