पृथ्वीला एलियन्स पासून धोका, हॉकिंग यांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार; डिसेंबरमध्ये…
GH News August 04, 2025 07:11 PM

पृथ्वीवर एलियन्स पाहिल्याचा दावा अनेकांनी केलेला आहे. महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी एलियन्स मुळे पृथ्वीवर संकट येण्याची भविष्यवाणी केली होती. आता हॉकिंग यांची भविष्यवाणी येत्या काळात खरी ठरण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. आगामी काळात मानव आणि एलियन्स यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एलियन्सशी संपर्क करणे धोकादायक

स्टीफन हॉकिंग हे एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. 2018 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी जगाला असा इशारा दिला होता की एलियन्सशी संपर्क करणे मानवती जीवनासाठी विनाशकारी ठरू शकते. आपण त्यांच्याशी संपर्क केल्यास त्यांच्याकडून प्राणघातक आक्रमण होईल. यामुळे पृथ्वीवरील संस्कृतींचा नाश होऊ शकतो.

स्टीफन हॉकिंग यांनी 2004 मध्ये म्हटले होते की, एलियन्सकडे असलेले तंत्रज्ञान पृथ्वीवरील तंत्रज्ञानापेक्षा प्रगत असू शकते. त्यामुळे मला वाटते की एलियन्सच्या बाबतीत मानवाने सावध भूमिका घेतली पाहिजे. आपण त्यांचा शोध घेणे थांबवले पाहिजे.

अशातच आता काही शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, येत्या डिसेंबरमध्ये पृथ्वीकडे एक रहस्यमय वस्तू (UFO) येण्याची शक्यता आहे. प्राध्यापक एव्ही लोएब आणि इतर की शास्त्रज्ञांनी इंटरस्टेलर ऑब्जेक्ट 3I/ATLAS संबंधित अभ्यास करत आहेत. जे जूनच्या अखेरीस आपल्या सूर्यमालेजवळून जाताना दिसते होते.

खगोलशास्त्रज्ञांनी 3I/ATLAS हा धूमकेतू होता असे जाहीर केले आहे, मात्र लोएब यांनी ही वत्सू कृत्रिमरित्या तयार केलेली असल्याचे म्हटले आहे. हे शुक्र, मंगळ आणि गुरूच्या अगदी जवळून जाणार आहे. हे वाहन आणि ते नियंत्रित करणारे एलियन्स आपल्याशी मैत्री करण्यासाठी किंवा आपल्याशी युद्ध करण्यासाठी आले असल्याची शक्यता आहे.

डिसेंबरमध्ये पृथ्वीजवळून जाण्याची शक्यता

खगोलशास्त्रज्ञांनी दिलेली माहिती खरी ठरली तर हा मानवतेसाठी मोठा धोका असेल. यासाठी काही उपाययोजना केल्या तरी त्या व्यर्थ ठरतील असं लोएब यांनी म्हटले आहे. 3I/ATLAS 17 डिसेंबर रोजी पृथ्वीपासून 223 दशलक्ष मैल अंतरावरून 41 मैल प्रति सेकंद (सुमारे 150,000 मैल प्रति तास) वेगाने सौरमालेतून जाण्याची शक्यता आहे.

प्रगत एलियन्स मानवतेचा नाश करू शकतात

स्टीफन हॉकिंग यांनी एलियन्स मानवतेचा नाश करू शकतात हे भाकित सत्य ठरण्याची शक्यता आहे. मात्र काही शास्त्रज्ञांनी एलियन्ससोबत संपर्क करण्याचे फायदे होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र तरीही आपण एलियन्सपासून सावध राहण्याची गरज आहे.

एलियन्सच्या सिग्नलला रिप्लाय न करण्याचे हॉकिंग यांचे आवाहन

स्टीफन हॉकिंग यांनी एलियन्सच्या सिग्नलला रिप्लाय न देण्याचा इशारा दिला होता. 2016 मध्ये हॉकिंग म्हणाले होते की 16 प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या ग्लिस 832 सी या ग्रहावर बुद्धिमान जीवसृष्टी असू शकते. त्याच्यापासून आपल्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण जेव्हा आकाशातील ताऱ्यांकडे पाहतो, त्यावेळी मलाही कोणीतरी पाहत आहे असं मला वाटते असंही हॉकिंग यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.