ॲड. पारिजात पांडे यांनी केली पाहणी
esakal August 05, 2025 04:45 AM

- rat४p९.jpg-
२५N८२०६७
मंडणगड: अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे मार्गदर्शक ॲड. पारिजात पांडे यांचे स्वागत करताना अप्पासाहेब मोरे, ॲड, मिलीद लोखंडे, प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर व अन्य.
---
ॲड पांडे यांनी मंडणगडातील
न्यायालयाच्या इमारतीची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः मंडणगड येथील कनिष्ठ न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. पारिजात पांडे यांनी नुकताच मंडणगड तालुक्याचा दौरा केला. तसेच न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली.
यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब मोरे, यश मेहता, गिरीश जोशी, मकरंद रेगे, मंडणगड तालुका बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ॲड. मिलिंद लोखंडे, ॲड. सचिन बेर्डे, ॲड. आदित्य सुळे, ॲड. सुमेश घागरुम ॲड. धनंजय करमरकर व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. दौऱ्याचे निमीत्ताने श्री. पांडे यांनी कनिष्ठ न्यायालय भिंगळोली येथे मंडणगड तालुका बार असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यासमवेत चर्चा केली. न्यायालयाचे इमारतीचे कामकाज व उद्घाटन सोहळ्याची तयारी यांचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत रायगड जिल्ह्यातील सरकारी वकील व रायगड जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड. संतोष पवार, रत्नागिरीचे सरकारी वकील ॲड. अनिरुद्ध फणसेकर, रत्नागिरी जिल्हा अधिवक्ता परिषदचे महामंत्री चिपळूण येथील ॲड. मिलिंद तांबे, खेड येथील ॲड. सिध्देश बुटला, मंडणगड नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजित कुंभार आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.