मोशी, ता. ४ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये मोशी येथील नागेश्वर माध्यमिक विद्यालयातील समिक्षा संदीप शेलार हिने ७५.४० टक्के तर आरती गणेश शेलार हिने ६६.६० टक्के गुण प्राप्त केले.
त्याबद्दल रयत शिक्षण संस्था, पश्चिम विभागीय सल्लागार समितीचे सदस्य सुदाम शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन शालेय वस्तू, प्रमाणपत्र फाईल भेट देत सत्कार केला. तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले मोशी कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुक्षमा शेलार, आजोबा शांताराम शेलार, अमोल शेलार व संगीता शेलार यांच्या उपस्थित होते.