मोहम्मद सिराज पाचव्या कसोटीचा नायक ठरला
भारताने पाचवी कसोटी जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली
जसप्रीत बुमराहने वर्कलोड व्यवस्थापनामुळे तीन सामने खेळले
Mohammed Siraj on bowling 1113 deliveries in a Test series : भारत-इंग्लंडकसोटी मालिकेत मोहम्मद सिराजने सर्व पाच सामने खेळले. जसप्रीत बुमराह वर्कलोड व्यवस्थापनामुळे तीनच सामने खेळला आणि अशा परिस्थिती सिराज हा टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज म्हणून जबाबदारी स्वीकारत चमकला. बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजची गोलंदाजी अधिक बहरली आणि त्यामुळे टीम इंडियाने विजयही मिळवले. एकीकडे वर्कलोडची चर्चा होत असताना सिराजच्या समर्पणाचे कौतुक होताना दिसत आहे. पाचव्या कसोटीनंतर सिराजला जेव्हा त्याच्या गोलंदाजीबाबत विचारल्या असता त्याने दिलेले उत्तर मन जिंकणारे ठरले.
मोहम्मद सिराजने या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक १८५.३ षटकं फेकली आणि सर्वाधिक २३ विकेट्सही घेतल्या. त्याने ४.०२च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. त्यानंतर पाच कसोटी सामने खेळणाऱ्या रवींद्र जडेजाने १४२.१ षटकं फेकली. सिराजला एका स्पेलमध्ये सलग कितीही षटकं फेकायला लावल्यास तो टाकू शकतो.. ओव्हलमधील ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार शुभमन गिलनेही सिराजचे कौतुक केले. प्रत्येक कर्णधाराला हवा असा गोलंदाज सिराज आहे. त्यामुळे त्याचे कौतुक होणे साहजिक आहे.
IND vs ENG 5th Test: शुभमन गिलच्या ७५४, तर हॅरी ब्रूकच्या ४८१ धावा, तरीही दोघांना Player Of The Series पुरस्कार कसा? गंभीरचा 'Role'भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३ सामन्यांत ११९.४ षटकं फेकून १४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर आकाश दीप ( १०९.१) व प्रसिद्ध कृष्णा ( १०५) यांनी शंभरहून अधिक षटकं टाकली. ओव्हल कसोटीनंतर सिराजला तू दमला नाहीस का? असे पत्रकारांनी विचारले. तू पाचही कसोटी खेळला, तुझं शरीर काय सांगतंय? तू किती दमला आहेस? तू स्वतःला कसं प्रेरणा देत राहिलास?
IND vs ENG 5th Test: आनंद पोटात माझ्या माईना! सुनील गावस्करांचा 'Lucky Jacket' अन् टीम इंडियाचा विजय Video Viralसिराज म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचं तरी शरीर आतातरी ठिक आहे. कारण, या मालिकेत मी जवळपास १८७ षटकं टाकली आहेत. पण, जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता, तेव्हा तुमचं सर्वस्व पणाला लावता. या पलिकडे फार काही विचार करत नाही. तू सहा षटकं टाकलीस, ९ षटकं टाकलीस... याची मी पर्वा करत नाही. माझा स्वतःवर विश्वास आहे आणि मी प्रत्येक चेंडू माझ्या देशासाठी टाकतो, माझ्यासाठी नाही. देशासाठी खेळताना १०० टक्के द्या...
सामन्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला, खरं सांगायचं, तर मला खूप आनंद झालाय.. पहिल्या दिवसापासून आम्हाला कडवी टक्कर द्यायची होती आणि हा निकाल पाहून खूप अभिमान वाटतोय. रणनिती सोपी होती की टप्प्यावर मारा करा. मी आज सकाळी उठलो तेव्हा, मी हे करू शकतो, असा मी स्वतःला विश्वास दिला. मी गुगलवर गेलो अन् Self Believe चा फोटो डाऊनलोड केला. तो फोटो मी मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवला.