असं म्हटलं जात की तुमच्या दिवसाची सुरुवात जर चांगली झाली नाही तर तुमचा संपूर्ण दिवस खराब जातो. या उलट जर तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जातो, तुमच्यासोबत अनेक चांगल्या गोष्टी घडतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार तुमच्या नजरेचा देखील तुमच्यासोबत दिवसभर घडणाऱ्या घटनांमध्ये महत्त्वाचा वाटा असतो. तुम्ही सकाळी जेव्हा झोपेतून उठला आणि तुमच्या नजरेला प्रथम ज्या वस्तू पडतात त्या वस्तुंमधून नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवाहीत होत असते, त्यामुळे वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या सकाळी उठल्यानंतर पाहू नयेत, असं म्हटलं जातं. जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
भांडण किंवा जोरजोरात सुरू असलेली आरडाओरड – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही सकाळी झोपेतून उठता तेव्हा तुम्ही कोणाचं भांडण पाहिलं किंवा कोणाच्या तरी जोरजोरात ओरडण्याचा आवाज तुमच्या कानावर पडला तर तुमचा दिवस खराब जाणार आहे, याचे हे संकेत असतात. अशा गोष्टी तुमच्या शरीरात किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतात, त्यामुळे तुमचं मन विचलित होतं, कामामध्ये मन लागत नाही, आणि तुमचा दिवस खराब जातो. त्यामुळे सकाळी -सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी तुमच्या इष्ट देवाची प्रार्थना करा.
भंगार सामान – तुमच्या घरात काही भंगार सामान पडलं असेल तर ते घरात न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो. कारण अशा सामानामुळे तुमच्या घरात प्रचंड नकारात्मक शक्ति राहाते आणि सकाळी तुम्ही जेव्हा या गोष्टी पाहाता तेव्हा तुमचा संपूर्ण दिवस वाईट जातो.
काळे प्राणी किंवा जखमी प्राणी – वास्तुशास्त्रानुसार सकाळी झोपेतून उठल्यानंतर काळे प्राणी जसं काळी मांजर असे प्राणी दिसणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)