खाडीत उडी मारणारा अजूनही बेपत्ता
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : कशेळी खाडीत रविवारी (ता. ३) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काजूवाडी येथील राजेशकुमार दुबे (वय ५३) यांनी उडी घेतली. ही माहिती मिळताच घटनास्थळी नारपोली पोलिस कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेत सात तासांत खाडीत शोध घेतला; मात्र दुबे मिळून न आल्याने सोमवारी सकाळीही पुन्हा आठ तास शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान, दुबे न मिळाल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.