शेअर बाजारात गेल्या महिन्यात मोठी घसरण पाहायला मिळाली असेल. या दरम्यान काही मोठ्या कंपन्यांचं नुकसान झालं आहे. मात्र, एका छोट्या शेअरनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या स्टॉकमध्ये गेल्या एका महिन्यात तेजी पाहायला मिळाली आहे. स्टॉकमध्ये एका महिन्यात अप्पर सर्किट लागलं आहे.
एक वर्षापूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक या स्टॉकमध्ये केली असती तर त्या गुंतवणुकीचं मूल्य 1 कोटी 93 लाख रुपये बनली आहे. एक वर्षापूर्वी या स्टॉकची किंमत 1.10 रुपये होती सध्या स्टॉक 224 रुपयांवर पोहोचला आहे.
एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेड स्टॉक आज 224 रुपयांवर पोहोचला आहे. या स्टॉकचा 52 आठड्यांचा निचांक 1.10 रुपये होता.या स्टॉकमध्ये गेल्या 45 दिवसांपैकी 30 अप्पर सर्किट लागलं आहे.
विशेष बाब म्हणजे या स्टॉकनं 15 दिवसात गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला आहे. या स्टॉकनं गेल्या एका महिन्यात 178 टक्के , सहा महिन्यात 1200 टक्के आणि एका वर्षात 19000 टक्के आणि पाच वर्षात 15000 टक्के रिटर्न दिला आहे.
एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला दुबईच्या प्राइम प्लेस स्पाइसेस ट्रेडिंग एलएलसीनं खरेदी केलं आहे. ही कंपनी एफएमसीजी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. या डीलमुळं एलीटकॉन इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. कंपनीचं बाजारमूल्य 32160 कोटी रुपये आहे. तर ,
एलीटकॉन इंटरनॅशन भारतीय कंपनी असून तंबाखू उत्पादनं बनवते आणि विक्री करते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ही कंपनी सक्रीय आहे. एलीटकॉन इंटरनॅशनल यापूर्वी काशीराम जैन अँड कंपनी लिमिटेड यानावानं ओळखली जायची याची सुरुवात 1987 मध्ये झाली होती.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशितः 05 ऑगस्ट 2025 08:46 पंतप्रधान (आयएसटी)
आणखी पाहा