शिवसैनिकांच्या दबावामुळे घाटकोपर येथील शाळेत हिंदी पेपर रद्द
esakal August 05, 2025 10:45 PM

शिवसैनिकांच्या दबावामुळे घाटकोपर येथील शाळेत हिंदी पेपर रद्द
घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) ः शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा समाविष्ट करण्याबाबत सरकारने अध्यादेश काढून निर्णय रद्द झाल्याचे घोषित केले आहे; मात्र तरीही अनेक शाळांत हिंदी विषयाची सक्ती केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. घाटकोपर येथील एका शाळेतील हिंदी विषयाची परीक्षा शिवसैनिकांनी दबाव निर्माण करून रद्द केली आहे. पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना याबाबत जाब विचारला. काही पालकांनी याबाबत शिवसेना ठाकरे गटाकडे तक्रार केली होती. या वेळी शिवसेनेचे विभागप्रमुख सुरेश पाटील, विधानसभा संघटक अशोक वंडेकर, प्रसाद कामतेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.