भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत युवा कर्णधार शुबमन गिलने यशस्वीरित्या जबाबदारी पेलली. फलंदाजी आणि कर्णधार म्हणून दोन्ही ठिकाणी आपलं नाव पक्कं केलं आहे. त्यामुळे कसोटी कर्णधार म्हणून शुबमन गिलच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. कारण या फॉर्मेटची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत उतरणार यात काही शंका नाही. पण वनडे संघाची मोर्चेबांधणी अजूनही झालेली नाही. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. दोघंही या फॉर्मेट खेळणार आहे. या दोघांचं लक्ष्य 2027 साली होणाऱ्या वनडे वर्ल्डकप आहे असं म्हंटलं जातं. पण तसं होईल का? हा देखील प्रश्न आहे. 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. मात्र पराभवाचं तोंड पाहावं लागलं. ऑस्ट्रेलियाने भारतीय कर्णधाराचं स्वप्न धुळीस मिळवलं. त्यामुळे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोहित शर्मा मैदानात उतरेल अशी आशा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. मात्र आता क्रीडावर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
भारतीय वनडे संघाची धुरा कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्याने कर्णधारपद सोडल्यानंतर तीन नावांचा विचार केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, या यादीत पहिलं नाव शुबमन गिलचं आहे. कारण त्याने कसोटी संघांचं कर्णधारपद यशस्वीरित्या पार पाडलं आहे. गिलनने वनडे फॉर्मेटमध्ये 8 शतकं आणि 2775 धावा केल्या आहेत. या शिवाय श्रेयस अय्यर याच नावही चर्चेत आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये नेतृत्व यशस्वीरित्या सांभाळलं आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो. याशिवाय हार्दिक पांड्याकडेही धुरा सोपवली जाऊ शकते. त्यामुळे ही तीन नाव सध्या चर्चेत आहे.
भारतीय संघ आता थेट ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यात भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यातच रोहित शर्माच्या नावाचा फैसला होऊ शकतो. या मालिकेत रोहित शर्माकडे धुरा सोपवली तर प्रश्नच सुटणार आहे. तसं झालं तर रोहित शर्माच्या नेतृत्वातच भारतीय संघ 2027 वर्ल्डकप स्पर्धेत उतरण्याची शक्यता आहे. ही वर्ल्डकप स्पर्धा दक्षिण अफ्रिका-झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तरित्या यजमानपद भूषवणार आहेत.