मेघना बोर्डीकर यांचा ग्रामसेवकाला धमकावणारा व्हिडिओ व्हायरल
रोहित पवार यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत टीका केली
बोर्डीकर यांनी ग्रामसेवकावर महिलांना त्रास दिल्याचा आरोप केला
रोहित पवार यांनी आणखी व्हिडिओ शेअर करत वाद आणखी वाढवला
रोहित पवार आणि आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय. ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देत असल्याचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर रोहित पवार यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत बोर्डीकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केलाय.
परभणी जिल्ह्यातील बोरी गावाच्या कार्यक्रमात मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली होती. याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी टिट्व केला होता. यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी संबंधित ग्रामसेवक गरीब आणि विधवा महिलांना छळत असल्याचा दावा केला होता. यानंतर रोहित पवारांनी मेघना बोर्डीकर यांच्या कार्यक्रमाचे आणखी दोन व्हिडीओ शेअर केलेत.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीमुळे 'आनंद' हिरावला? गणेशोत्सवात नाही मिळणार 'आनंदाचा शिधा'एका व्हिडिओत एक व्यक्ती व्यासपीठावर मेघना बोर्डीकर यांच्या शेजारी उभा राहून माईकवरुन बोलत आहे. हा व्हिडीओ बराच जुना असल्याचे सांगितले जाते. या कार्यक्रमाला पोलीसही उपस्थित होते. त्यावेळी माइक जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने पोलिसांना शिवी देत इशारा दिला. माझ्या तिकडे गाड्या आहेत. तिकडे कोणी माझ्या लोकांच्या गाड्यांना हात लावला तर माय झ#$ टाकेन पोलिसांची, लक्षात ठेवा असा दम तो व्यक्ती देताना दिसतोय.
Dattatray Bharne: कृषिमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच दत्तात्रय भरणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी...संबंधित व्यक्ती पोलिसांना शिवीगाळ करत असताना राज्यमंत्री असलेल्या मेघना बोर्डीकर बाजूला शांतपणे उभ्या आहेत. त्यांनी एकदाही संबंधित व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मेघना बोर्डीकर टाळ्या वाजवून या व्यक्तीला प्रोत्साहन देताना व्हिडीओत दिसत आहेत. दुसरा व्हिडीओ हा ग्रामसेवकाला धमकावण्यात आलेल्या बोरी गावातील आहे. या कार्यक्रमाला गर्दी न झाल्यामुळे मेघना बोर्डीकर ग्रामसेवकावर नाराज झाल्याचा दावा रोहित पवारांनी केला. मेघना बोर्डीकर यांनी त्यांचे भाषण सुरू असताना संबंधित ग्रामसेवकाला व्यासपीठाच्या खालच्या बाजूला बोलावून घेतलं. त्यानंतर या ग्रामसेवकाला त्यांनी धमकावलं.