मुंबई : चर्चगेट ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेने १४ ठिकाणी लोकलच्या वेगमर्यादा शिथिल केल्या आहेत. २४ एप्रिल ते २५ जुलैदरम्यान या मर्यादांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे लोकल गाड्यांचा सरासरी वेग वाढणार असून, प्रवाशांना आपले नियोजित ठिकाण वेळेवर गाठता येणार आहे.
रेल्वेमार्गांवर दुरुस्ती, तांत्रिक कामे, हवामानाशी संबंधित कारणांमुळे गाड्यांच्या वेगावर निर्बंध घालावे लागतात, या वेगमर्यादा ३० ते ५० किलोमीटर प्रति तासादरम्यान असतात. मात्र, यामुळे लोकल गाड्यांचा वेग कमी होतो आणि वेळापत्रकावर परिणाम होतो. पश्चिम रेल्वेच्या हद्दीत माटुंगा-माहीम, माहीम-वांद्रे, सांताक्रूझजवळ, अंधेरी यार्डमध्ये, जोगेश्वरी-गोरेगाव आणि नायगाव-नालासोपारा या मार्गांवर वेगमर्यादा यापुर्वी लागू करण्यात आल्या होत्या. त्यातील १४ मर्यादा शिथिल करण्यात आल्याने, सध्या चर्चगेट ते विरारदरम्यानचा प्रवास दोन मिनिटांनी लवकर होणार आहे.
प्रवाशांची होणार कोंडी! रेल्वेनंतर वाहतूक विभागाचा ब्लॉक; खड्डे समस्यांसाठी 'या' मार्गावर ३ दिवस प्रवेश बंद रेल्वे मार्गांवरील सरासरी वेगमुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गात लाेकलच्या वेगावर विविध कारणांमुळे मर्यादा घातल्या जातात, त्यामुळे धीम्या मार्गावरील सरासरी वेग ३५ किलोमीटर प्रतितास तर जलद मार्गावर हा वेग ४० ते ५० किलोमीटर पर्यंत असतो. मात्र, धोकादायक किंवा दुरुस्तीनुसार संवेदनशील ठरलेल्या टप्प्यांवर लोकलचा वेग ३० किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षाही कमी करण्यात येतो.
नायगाव-नालासोपारा विभागातील निर्बंध हटवलेपश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार नायगाव-नालासोपारा विभागात ३० जून रोजी चेतावणी आदेश काढून टाकण्यात आले. प्रभावित भागात अपुरी संक्रमण लांबी, अयोग्य सुपर एलिव्हेशन आणि अनियमित ओव्हरहेड वायरिंगशी संबंधित समस्यांमुळे हे निर्बंध लादण्यात आले होते, जे आता सोडवण्यात आले आहेत."
Maharashtra Politics: बविआ आणि ठाकरे सेनेला धक्का, अनेक नेते भाजपात दाखल! डाउन हार्बर लाईनतसेच, खार रोड आणि सांताक्रूझ दरम्यान डाउन हार्बर लाईनवर तीन इतर चेतावणी आदेश देखील काढून टाकण्यात आले. "या निर्बंधांमुळे चर्चगेट-विरार मार्गावर एकूण दोन मिनिटांचा अतिरिक्त प्रवास वेळ कमी झाला," असे अधिकाऱ्याने सांगितले. "जरी दोन मिनिटांचा विलंब किरकोळ वाटत असला तरी, या चेतावणी आदेशांमुळे दिवसभर त्याचा चांगलाच परिणाम झाला. यामुळे सध्या वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली असून नजीकच्या भविष्यात वेळेवर लक्षणीय सुधारणा होण्याची आम्हाला अपेक्षा आहे," असेही अधिकाऱ्याने सांगितले.