82397
वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर
कणकवली शहरात नाकाबंदी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.५ ः कणकवली शहर तसेच तालुक्यात होणाऱ्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आज कणकवलीत नाकाबंदी करून सर्व वाहनांची तपासणी करण्यात आली. दुपारी बारा पासून महामार्गावरील जानवली पुलावर ही कारवाई सुरू होती.
कणकवली पोलिसांच्या या तपासणीमध्ये विनापरवाना वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट वापरणे, वाहनासादर्भात अपूर्ण कागदपत्रे असलेल्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच ड्रिंक अँड ड्राईव्हच्याही चाचण्या करण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अशा प्रकारची तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली. या तपासणी पथकात पोलिस उपनिरीक्षक पवन कांबळे, महिला पोलिस प्रणाली जाधव, वाहतूक पोलिस दिलीप पाटील, पोलिस दिग्विजय काशीद, हवालदार दीपक चव्हाण आदी सहभागी झाले होते. अचानक नाकाबंदी झाल्याने महामार्गावरून जाणाऱ्या अनेक वाहन चालकांचे धाबे दणाणले होते.