ICC Test rankings after India vs England 2025 series: भारताचा इंग्लंड दौरा हा खऱ्या अर्थाने संस्मरणीय बनवला तो मोहम्मद सिराज याने... पाचव्या कसोटीत काहीही करून भारताला विजय हवा होता, परंतु यजमान इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. तिथून सिराजने त्यांना मागे ओढले अन् टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. पाच सामन्यांच्या मालिकेत सिराजने सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( icc) त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत सिराजने कारकीर्दितील सर्वोच्च रेटींग मिळवले आहेत, त्याच्यासह प्रसिद्ध कृष्णानेही रेटींगमध्ये सर्वाधिक गुणांची कमाई केली आहे. सिराज ६७४ रेटींगसह १२ स्थानांच्या सुधारणेसह १५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्रसिद्ध कृष्णानेही पाचव्या कसोटीत सिराजचा तोडीसतोड साथ दिली आणि याच कामगिरीच्या जोरावर त्याने कारकीर्दितील सर्वोत्तम ३६८ रेटींग गुण मिळवले. प्रसिद्ध २५ स्थानांच्या सुधारणेसह ५९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
IPL 2026 Update: संजू सॅमसन CSKच्या ताफ्यात नाही जाणार; RR फ्रँचायझीने केला गेम, MS Dhoni चा प्लॅन फसलाइंग्लंडचा जलदगती गोलंदाज गस एटकिन्सन व जोश टंग यांच्याही क्रमवारीत सुधारणा झाली आहे आणि ते अनुक्रमे १० व ४६ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. कसोटी गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह ( ८८९) अव्वल स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, न्यूझीलंडचा मॅट हेन्री व ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड हे अव्वल पाचमध्ये आहेत.
ओव्हल कसोटीतील शतकवीर यशस्वी जैस्वालने आठव्या क्रमांकावरून थेट पाचव्या स्थानी झेप घेतली आहे आणि तो भारताचा नंबर १ कसोटी फलंदाज ठरला. यशस्वीने कारकीर्दितील सर्वाधिक ७९२ रेटींग गुण कमावले आहेत. इंग्लंडचा जो रुट व हॅरी ब्रूक हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत .न्यूझीलंडचा केन विलियम्सन व ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हे यशस्वीच्या पुढे आहेत. रिषभ पंतला एक स्थान खाली सकरून आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे, तर शुभमन गिल चार स्थान खाली घसरला आहे. तो १३ व्या स्थानावर आहे.
ODI WC 2027: विराट कोहली, रोहित शर्मा वन डे वर्ल्ड कप नाही खेळणार! BCCI च्या डोक्यात शिजतोय वेगळाच प्लॅन, चर्चा करणार अन्...ट्वेंटी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा टीम डेव्हीड हा दोन स्थान वर सरकून १६व्या क्रमांकावर आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने खणखणीत शतक झळकावले होते. पाकिस्तानाचा सईम अयुबही ३७व्या स्थानावरून २५व्या क्रमांवार पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये जेसन होल्डरने २३ स्थानांच्या सुधारणेसह केशव महाराजसह संयुक्त ३२वे स्थान पटकावले आहे.