Ganesh Utsav 2025 : गणेशोत्सवात लेसर बंदी; उल्लंघन करणाऱ्यावर होणार फौजदारी कारवाई
Saam TV August 06, 2025 06:45 PM

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या काळात आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत लेसर विद्युत रोषणाईचा उपयोग केला जातो. मात्र यातील लेसर अत्यंत घातक ठरत असल्याने गणेशोत्सवात लेसर बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. तर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर थेट फौजदारीची कारवाई करण्यात येणार आहे. 

यंदाचा गणेशोत्सव२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. अर्थात काही दिवसांवर गणेशोत्सव आला असल्याने त्या अनुषंगाने आता तयारी सुरु झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांची देखील तयारी सुरु झाली आहे. गणेश मूर्ती बुकिंग पासून मिरवणुकीसाठी ढोल- ताशे व डीजेची बुकिंग देखील केली जात आहे. मात्र हे करत असताना कोल्हापूरजिल्ह्यात गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत तसेच इतर कार्यक्रमांदरम्यान लेसर लाईटचा वापर करता येणार नाही. 

Zp School : मराठी सोबतच विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचेही धडे; मावळच्या जिल्हा परिषदे शाळेचा अभिनव उपक्रम

गतवर्षी आगमन मिरवणुकीत घडली होती घटना 

गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचे आयोजन केले जाते. त्यामध्ये मंडळांकडून लेसरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. गतवर्षी आगमन मिरवणुकीत भाविकांच्या डोळ्यांवर असे लेसर पडल्याने डोळ्यांचा पडदा बुबुळाला इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचा विचार करत यंदा अशा घटना होऊ नये; यासाठी लेसर लाईट वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 

Electric Shock : बांधावर घातलेल्या तार कंपाउंडमुळे युवकाचा गेला जीव; ऊसाच्या संरक्षणासाठी सोडला होता विद्युत प्रवाह

तर होणार फौजदारी कारवाई 

दरम्यान जिल्हाधिकारींनी गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान लेसरवर बंदी घातली आहे. त्या संदर्भातील आदेश काल जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जारी करण्यात आले आहेत. याचे काटेकोर पालन गणेश मंडळांना करावे लागणार आहे. अर्थात या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात दिला आहे. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.