टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत याने इंग्लंडविरोधीत कसोटी सामन्यात कमाल दाखवली. चौथ्या कसोटीत जखमी असतानाही त्याने दमदार खेळी खेळली. त्याने अर्धशतक ठोकले. जखमी असतानाही तो मैदानावर टिकून होता. त्याचे इंग्लंडच्या खेळाडूंनी पण कौतुक केले. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी पंत विषयी काळजी व्यक्त केली. त्याला आता एकदम एकटं सोडा असं तेंडुलकर म्हणाले.
सचिन पण ऋषभचे फॅन
सचिन तेंडुलकर यांनी रेडिटच्या माध्यमातून ऋषभ पंतबाबत मत व्यक्त केले आहे. मला वाटते ऋषभ पंत याला एकटे सोडणे आवश्यक आहे. त्याच्याकडे अगोदरच खेळाचे नियोजन असते. तो त्याची अंमलबजावणी पण जबरदस्त करतो. तो जखमी असतानाही त्याने टीमची सोबत कायम ठेवली. त्याने मैदान सोडले नाही. मला हे पाहुन एकदम चांगले वाटले, अशा शब्दात तेंडुलकरांनी मत व्यक्त केले.
ऋषभ पंतचे प्रदर्शन या संपूर्ण कसोटीत जोरदार ठरले. त्यांनी चार कसोटी सामन्यांमध्ये 68.43 च्या सरासरीने 479 धावा काढल्या. पंतने या मालिकेत दोन शतक ठोकले. तर तीन अर्धशतक ठोकले. पहिल्या कसोटीच्या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडुने शतक ठोकले.
इंग्लंड-भारत मालिका बरोबरीत
इंग्लंड आणि भारतातील कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीत सुटली. या दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. तर दुसरी कसोटी भारताने खिशात घातला. तिसऱ्या कसोटीत यजमान देशाने पुनरागमन केले. तर चौथी कसोटी अनिर्णित राहिली. पाचवा आणि अखेरचा सामना भारताने जिंकला.
ऋषभ पंतने टीम इंडियाकडून आतापर्यंत 47 कसोटी सामने खेळेल आहेत. त्यात 44.51 सरासरीने 3427 धावा काढल्या. त्याच्या नावावर 18 अर्धशतकं आणि 8 शतकं आहेत. कसोटी सामन्यात पंतने सर्वाधिक 159 धावा काढल्या आहेत. या सामन्यात त्याने केवळ भारतीयच नाही तर जगातील अनेक खेळाडुंची मनं जिंकली आहे. जखमी असताना त्याने करून दाखवलेल्या कामगिरीवर जगभरातून त्याचे कौतुक झाले. त्यातच मास्टर ब्लास्टरने ऋषभ पंत याला एकटे सोडणे आवश्यक आहे, असे वक्तव्य सचिन तेंडुलकर यांनी काळजीपोटी केले आहे.