देशात सण, उत्सवांचा काळ येताच रेल्वे स्टेशन्सवर मोठी गर्दी पहायला मिळते. अनेकदा तिकीट न मिळाल्यामुळे लोकांना हजारो किमीचा प्रवास उभा राहून करावा लागतो. आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे. जर, तुम्ही येण्या-जाण्याचं तिकीट एकाचवेळी काढलं तर तुम्हाला 20 टक्के डिस्काऊंट मिळेल. रेल्वे मंत्रालयाने राऊंड ट्रिप पॅकेजची सुरुवात केली आहे. सण-उत्सावांच्या काळात ट्रेन्समध्ये होणारी मोठी गर्दी आणि तिकिटांच्या मारामारीतून मार्ग काढण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवीन योजना आणली आहे. याचं नाव आहे, राऊंड ट्रिप पॅकेज फॉर फेस्टिवल रश. याचा उद्देश आहे, प्रवाशांना स्वस्तात येण्या-जाण्याचं तिकीट देऊन गर्दीची वेगवेगळ्या दिवसात विभागणी करणं, जेणेकरुन रेल्वे प्रवास आरामदायक होईल.
रेल्वेनुसार, या योजनेतंर्गत जर कुठला प्रवासी येण्या-जाण्याच तिकीट एकाचवेळी बुक करत असेल, तर परतीच्या प्रवासात बेस प्राइसवर 20 टक्के सवलत दिली जाईल. ही सवलत त्याच प्रवाशांना मिळेल, जे येण्या-जाण्याच तिकीट एकच नाव आणि डिटेल्ससह बुक करतील. दोन्ही तिकीट एकच क्लास आणि एकाच स्टेशन्सचे असले पाहिजेत. येण्याचं तिकीट 13 ऑक्टोंबर ते 26 ऑक्टोंबर 2025 दरम्यानच पाहिजे. परतीच तिकीट 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यानच पाहिजे.
कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल?
या नव्या स्कीममध्ये येण्याच तिकीच आधी बुक करावं लागेल आणि त्यानंतर कनेक्टिंग जर्नी फीचरद्वारे परतीच तिकीट बुक करावं लागलं. परतीच तिकीट बुक करताना Advance रिजर्वेशन पीरियड (ARP) नियम लागू होणार नाही. अट एवढीच आहे की, दोन्ही बाजूंनी तिकीट कन्फर्म पाहिजे. तिकीटात काही बदल करता येणार नाही. रिफंडची कुठली सुविधा मिळणार नाही. रिर्टन तिकीट बुक करताना कुठली अन्य सवलत वाउचर, पास, PTO किंवा रेल्वे ट्रॅव्हल कूपन लागू होणार नाही.
तिकीट बुकिंग कशी करायची?
ही स्कीम सर्व क्लास आणि सर्व ट्रेन्सना लागू आहे. यात स्पेशल ट्रेन्सचा सुद्धा समावेश आहे. Flexi Fare वाल्या ट्रेन्समध्ये ही सुविधा नसेल. दोन्ही तिकीटं एकाच माध्यमातून बुक करावी लागतील. एकतर ऑनलाइन किंवा रिजर्वेशन काउंटरवर जाऊन.
विस्तृत प्रचार करण्याचे निर्देश
या ऑफरमुळे सणांच्या काळात प्रवाशांची गर्दी वेगवेगळ्या तारखांमध्ये वाटली जाईल. खास ट्रेन्सचा दोन्ही बाजूने योग्य उपयोग होईल. प्रवाशांना सहज तिकिट मिळेल असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत आहे. रेल्वेला प्रेस, मीडिया आणि स्टेशन्सवरुन घोषणेद्वारे विस्तृत प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.